नेतर्डे-खोलबागवाडीत उद्या “कालचक्र” दशावतारी नाट्यप्रयोग

बांदा ता.१३-:* नेतर्डे-खोलबागवाडी येथील काळादेव देवस्थान येथे खोलबाग युवा मंचच्या वतीने गुरुवार दिनांक १४ रोजी सकाळी सत्यनारायण महापूजा व सायंकाळी ८ वाजता जय हनुमान मंडळाच्या “कालचक्र” या दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी याठिकाणी देवाची पूजा-अर्चा, अभिषेक, महापूजा व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर रात्री नाट्यप्रयोग होणार आहे. खोलबाग येथे तब्बल एका दशकानंतर अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन युवा मंचच्या वतीने प्रदीप कुबल व राजाराम कुबल यांनी केले आहे.

You cannot copy content of this page