बांदा-उभाबाजार हनुमान मंदिरात दोन दिवस हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

बांदा ता.१३-:* बांदा शहरातील उभाबाजार येथील प्रसिद्ध श्री दक्षिणाभीमुखी हनुमान मंदिरात शुक्रवार दिनांक १५ व शनिवार दिनांक १६ रोजी दोन दिवस श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवारी १५ रोजी रात्री १० वाजता स्थापेश्वर दशावतार नाट्यमंडळ डेगवे यांचा “श्रीकृष्ण हनुमान युद्ध” हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. शनिवारी १६ रोजी सकाळी ६ वाजता श्री हनुमान जन्म सोहळा व पारंपरिक श्री हनुमान फेरी होणार आहे. सायंकाळी ४ ते ६ या वेळेत श्री रामनाम जप होणार आहे. सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. लक्ष्मण नेवाळकर (कुडाळ) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन हनुमान सेवक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page