दापोली येथे १३ ते १७ मे मध्ये आयोजन;सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे डॉ संजय भावे यांचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी ता १३ डॉ . बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ , दापोली या विद्यापीठाने कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्तार या त्रिसूत्रीच्या माध्यमातून कोकणातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मोलाचे कार्य केले आहे . आतापर्यंत विद्यापीठाने विविध पिकांच्या जाती , कृषि औजारे आणि कृषि व तत्सम तंत्रज्ञान शेतकऱ्यासाठी विकसित केले आहे. २०२१-२२ हे कृषी विद्यापीठाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून त्याचे औचित्य साधून विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा प्रचार अधिक प्रभावीरित्या व्हावा , या उद्देशाने १३ ते १७ मे २०२२ या कालावधीत दापोली येथे सुवर्णपालवी या नावीन्यपूर्ण कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ संजय भावे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली शिक्षण विस्तार शिक्षण संचालक विभागामार्फत विद्यापीठाच्या सुवर्ण पालवी कृषी महोत्सव आयोजना बाबत आज येथील पत्रकार कक्षात विस्तार शिक्षण संचालक डॉ संजय भावे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी कृषि विद्यालयाचे वरिष्ठ शास्रन्य भास्कर काजरेकर, डॉ नितीन सावंत, डॉ मंदार खानविलकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस एन म्हेत्रे उपस्थित होते.
डॉ . बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ , दापोली हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील एक नामांकित कृषि विद्यापीठ असून कोकणातील शेतीचा मानबिंदू म्हणून सर्वत्र ओळख आहे. या विद्यापीठाची स्थापना कोकणचे सुपुत्र तत्कालीन कृषि मंत्री कै . डॉ . पी . के तथा बाळासाहेब सावंत यांच्या प्रेरणेने १८ मे १९७२ रोजी झाली . सन २०२१-२२ हे वर्ष विद्यापीठाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून गेल्या ५० वर्षात विद्यापीठाने कृषि शिक्षण , संशोधन आणि विस्तार या त्रिसूत्रीच्या माध्यमातून कोकणातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मोलाचे कार्य केले आहे . आतापर्यंत विद्यापीठाने विविध पिकांच्या जाती , कृषि औजारे आणि कृषि व तत्सम तंत्रज्ञानाच्या शिफारशी शेतकऱ्यांसाठी प्रसारित केल्या आहेत . या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा प्रचार अधिक प्रभावीरित्या व्हावा , या उद्देशाने १३ ते १७ मे २०२२ या कालावधीत सुवर्णपालवी या नावीन्यपूर्ण कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे .
शेतकऱ्यांना विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाबरोबरच इतर संस्थांनी केलेले कार्य , कृषि विभागाच्या विविध योजनाची माहिती व्हावी , यादृष्टीने महाराष्ट्रातील इतर तीन कृषि विद्यापीठे , महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग व इतर संलग्न विकास विभाग तसेच कृषि क्षेत्रात कार्यरत असलेल्या खाजगी कंपन्या , निमशासकीय संस्था , महामंडळे , बँका , बचत गट इत्यादी या कृषि महोत्सवात सहभागी होणार आहेत .
या महोत्सवामध्ये विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची ओळख होण्याच्या दृष्टीने विद्यापीठाच्या विविध प्रक्षेत्रांवर प्रात्यक्षिकांचे आयोजनही करण्यात येणार आहेत . त्याचबरोबर परिसंवाद , चर्चासत्रे , शिवार फेरी , प्रशिक्षण , खाद्य पदार्थ स्पर्धा इत्यादी उपक्रमांच्या माध्यमातून शेतकन्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत . या महोत्सवाला कोकणातील तसेच महाराष्ट्रातील इतर भागातील लाखो शेतकरी भेट देतील अशा प्रकारचे नियोजन केले आहे . या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आणि समारोप प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तसेच मुख्यमंत्री महोदय यांना निमंत्रित करण्यात आले आहे .
त्याच प्रमाणे राज्याचे कृषि मंत्री ,कृषि राज्य मंत्री , कोकणातील पाचही जिल्हयाचे पालक मंत्री तसेच इतर मान्यवरांना या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आणि समारोप प्रसंगी निमंत्रित करण्यात आले आहेत अशी माहिती यावेळी डॉ संजय भावे यांनी दिली. शेतकऱ्यांनी ४ मे पर्यन्त नाव नोंदणी करावी दापोली येथे होणाऱ्या महोत्सवात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे आपली नाव नोंदणी करावी. या महोत्सवात विविध विषयावरील १३ परिसंवाद होणार असून प्रत्येक परिसंवादाला किमान १०० शेतकरी उपस्थित रहतील असे नियोजन करण्यात आले आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दापोली येथे घेऊन जाण्याचे नियोजन अधीक्षक कृषि कार्यालयाने केले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
