आमदार दीपक केसरकर उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

*सावंतवाडी ता.१३-:* आमदार दीपक केसरकर हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. सकाळी ९:३० वाजता चराठा येथील पंचशील नगर नामफलकाचे अनावरण, सकाळी १०:०० वाजता ओटवणे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमास उपस्थितीत,

सकाळी १०:३० वाजता सावंतवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमास उपस्थितीत, सकाळी ११:१५ जिल्हा परिषद शाळा वेर्ले-२ येथे अमृतमहोत्सवी सोहळ्यास उपस्थित, दुपारी १२ वाजता निवृत्त सैनिकांच्या सन्मान सोहळ्यास उपस्थित, त्यानंतर सायंकाळी ४ वाजता कणकवली येथे आपला सिंधुदुर्ग चा प्रथम वर्धापनदिन सोहळ्यास उपस्थित, त्यानंतर सोयीनुसार ते न्हावेली येथील दशावतारी नाट्य महोत्सवास उपस्थित राहणार आहेत. तर सायंकाळी कळसुलकर हायस्कूल येथे होणाऱ्या संगीत मत्स्यगंधा नाटकाला उपस्थित राहणार आहेत.

You cannot copy content of this page