सलग ८ ते १८ तास अभ्यास करून डॉ. आंबेडकर यांचा जन्मदिन होणार साजरा

युनिक अकॅडमी कणकवलीचा उपक्रम

कणकवली ता.१३-:* भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन 14 एप्रिल रोजी आहे. त्यांचे शैक्षणिक महत्त्व समजून घेतल्यास आपल्या लक्षात येईल की, त्यांनी अनेक पदव्या अगदी कमी कालावधी मध्ये मिळवल्या. १८ ते २१ तास सलग अभ्यास करून सहा वर्षाचा अभ्यास दोन वर्षात पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर वंदन करण्यासाठी युनिक अकॅडमी कणकवलीच्यावतीने १४ एप्रिल २०२२ रोजी, कमीत कमी सलग ८ तास ते जास्तीत जास्त १४ किंवा १८ तास अभ्यासाला बसून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक समाजिक क्रांत्या केल्या. अखंड भारतीय समाजाला एका संविधानामध्ये आणले.

अमेरिकेसारख्या देशाने त्यांना जागतिक पातळीवर सिम्बॉल ऑफ नॉलेज अस गौरविले आणि कोलंबीया युनिव्हर्सिटी मध्ये त्यांचा अर्धपुतळा बसवला. आपण विद्यार्थी म्हणून काय शिकाल.बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात, ‘मनुष्य हा आजन्म विद्यार्थी असला पाहिजे.’ या महान भारतीय व्यक्तीला अभिवादन करायचं असेल तर आपण स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहात तुम्हांला प्रोत्साहन म्हणून युनिक अकॅडमी कणकवलीच्यावतीने १४ एप्रिल २०२२ रोजी, कमीत कमी सलग ८ तास ते जास्तीत जास्त १४ किंवा १८ तास अभ्यासाला बसून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचा संकल्प करूया. जे विद्यार्थी अकॅडमीत येऊन या उपक्रमामध्ये भाग घेतील त्यांना कुडाळ-मालवणच्या कर प्रशासकीय अधिकारी गितांजली लक्ष्मण नाईक यांच्याकडून स्वेच्छेने दोन वेळ थंड पेय आणि संध्याकाळी चहा बिस्कीट देऊन प्रोत्साहन दिले जाणार आहे. जे विद्यार्थी घरातून किंवा इतर ठिकाणाहून सहभागी होतील त्यांनी अभ्यासाला बसल्यावर आपला फोटो शेअर करून प्रामाणिकपणाने या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे .सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्याची विशेष दखल घेतली जाईल असे युनिक अकॅडमी कणकवलीने जाहीर केले आहे.

You cannot copy content of this page