मुबलक आणि सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी विजयदुर्ग ग्रामस्थांचा आक्रोश घागर मोर्चा…

प्रभारी कार्यकारी अभियंता यांना पाणी पुरवठा सुरळीत करण्याची केली मागणी

देवगड ता.१३-: विजयदुर्ग प्रादेशिक नळयोजनेचा पाणी पुरवठा सुरळीत व मुबलक प्रमाणात करण्यात यावा .या मागणी करीता विजयदुर्ग येथील ग्रामस्थांनी सरपंच उपसरपंच,सदस्य यांच्यासमवेत रिकाम्या घागरी घेऊन आक्रोश घागर मोर्चा देवगड येथील ग्रामीण पुरवठा कार्यालयावर काढून प्रभारी कार्यकारी अभियंता उदयकुमार महाजनी,यांचेशी चर्चा करून विजयदुर्ग येथील पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत व मुबलक प्रमाणात करावा अशी आग्रही मागणी केली. या चर्चेत प्रामुख्याने विजयदुर्ग प्रादेशिक नळपाणी योजनेवरील वाघोटण ते विजयदुर्ग पाईप ही जीर्ण झाली असून त्या पाईप लाईन वरील गळती काढण्याचे काम पूर्णत्वास जाऊन पाणीपुरवठा सुरळीत तसेच मुबलक केला जाईल त्याचबरोबर या योजनेवरील जी गावे टंचाईग्रस्त आहेत व ज्या गावांना याच योजनेवर अवलंबून रहावे लागते त्यांना अग्रक्रमाने पाणीपुरवठा करण्यात येण्याचे आश्वासन या वेळी नळग्राहक ग्रामस्थांना देण्यात आले. या पूर्वी ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय देवगड यांचेकडे सुरळीत व मुबलकं पाणीपुरवठा करण्याकरिता ३ मार्च रोजी आक्रोश घागर मोर्चा काढण्यात येणार होता .

परंतु त्यानंतर पाणीपुरवठा एक दोन दिवसच सुरळीत झाल्याने,पुन्हा एकदा १३ एप्रिल रोजी शांततेच्या मार्गाने रिकाम्या घागरी घेऊन विजयदुर्ग येथील नळग्राहक महिला व पुरुष यानी देवगड ग्रामीण पुरवठा कार्यालयावर धडक दिली .व चर्चा केली. या वेळी ग्रा.पा. पु.कार्यकारी अभियंता उदयकुमार महाजनी,गटविकास अधिकारी अरुण चव्हाण,सरपंच प्रसाद देवधर,उपसरपंच महेश बिडये,शाखा अभियंता संदीप पवार,यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रा प सदस्य संजना आळवे,संपदा लेले,माजी सरपंच शीतल पडेलकर,कृष्णकांत जावकर, निलेश मणचेकर,आनंद देवरुखकर,मनोहर बिर्जे,योगिता डोंगरे,रंजिता कोयंडे, फैजान सोलकर,संतोष गिरकर,विठाबाई बांदकर यांनी सविस्तर चर्चा करून विजयदुर्गं येथील पाणीपुरवठा मुबलक व सुरळीत करण्याची मागणी केली.

You cannot copy content of this page