Headlines

मालवणात २५ रोजी नाभिक समाजाची नियोजन बैठक

मालवण ता.२३-:* ओरोस येथे नाभिक समाज राज्य कार्यकारिणीची सभा दि. २३ मे रोजी होणार आहे. या सभेला राज्याचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सभेच्या नियोजनासाठी २५ एप्रिल रोजी भैरवी मंदिर मालवण येथे सकाळी ११ वाजता बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला मालवण तालुक्यातील सर्व नाभिक बांधवांनी विभागप्रमुख यांनी वेळीच उपस्थित राहवे, असे आवाहन मालवण तालुका…

Read More

मारहाण प्रकरणातील दोन संशयित आरोपींची जामिनावर सुटका

मालवण ता.२३-:* मारहाण व चोरी प्रकरणी दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत असलेल्या संशयित आरोपी उदय सुधाकर नार्वेकर (४५), विनोद गोपाळ नार्वेकर (५१ रा. काळसे बागवाडी) या दोघा संशयितांची जामिनावर सुटका झाली आहे. काळसे बागवाडी येथील उल्हास नारायण नार्वेकर यांच्या कारखान्याच्या जागेच्या मालकीवरून झालेल्या वादात उदय सुधाकर नार्वेकर, विनोद गोपाळ नार्वेकर यांनी उल्हास नार्वेकर यांना मारहाण केल्याप्रकरणी…

Read More

किल्ले रामगड येथे १ मे रोजी स्वराज्याचा आनंद सोहळा

मालवण ता.२३-:* दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र आणि रामगड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक किल्ले रामगड येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रविवार १ मे रोजी ‘स्वराज्याचा आनंद सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने २०१५ साली गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘किल्ले रामगड’चे संवर्धन करण्याचा विडा उचलला. आजमितीला त्यांच्या शिवकार्याला ७ वर्षे पूर्ण होत आहेत. चारही बाजूनी झाडी झुडपांमध्ये…

Read More

राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेचा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे आज समारोप…

अर्चना घारे यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी तालुक्यातून शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते कोल्हापूर येथे रवाना सावंतवाडी ता.२३-:* राष्ट्रवादी काँग्रेसची सुरू असलेल्या परिवार संवाद यात्रेचा आज कोल्हापूर येथे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप होत असून, या कार्यक्रमासाठी आज सावंतवाडी तालुक्यामधील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सावंतवाडी विधानसभा अध्यक्षा अर्चना घारे परब यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे रवाना झाले आहेत. या…

Read More

केसरीतील युवकांची फसवणूक करणाऱ्या “त्या” व्यक्तीवर तात्काळ कारवाई करा…

केसरी येथील ग्रामस्थांची संजू परब यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी. सावंतवाडी ता.२३-:* तालुक्यातील केसरी गावातील पाच मुलांकडून प्रत्येकी एक लाख रुपये घेऊन त्यांना दुबई येथे नोकरी लावतो असे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्या प्रकरणी त्या इस्मावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी भाजप जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली केसरी…

Read More

निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा:आम.वैभव नाईक

कणकवली आचरेकर प्रतिष्ठान येथे रानफुले छायाचित्र व पुस्तक प्रदर्शन कणकवली ता.२३-:* जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवलीच्या वतीने वामन पंडित यांचे १४ वे रानफुले छायाचित्र प्रदर्शन आणि पुस्तक प्रदर्शन कार्यक्रम कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला आहे. आज सायंकाळी आमदार वैभव नाईक, कणकवली कॉलजेचे प्राध्यापक डॉ. बाळकृष्ण गावडे यांच्या…

Read More

आम्ही सावंतवाडीकर यांच्या माध्यमातून सावंतवाडीत इफ्तार मेळाव्याचे आयोजन…

डॉ. जयेंद्र परुळेकर यांची माहिती… सावंतवाडी ता.२३-:* आम्ही सावंतवाडीकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी २५ एप्रिल रोजी इफ्तार मनोमिलन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, हा कार्यक्रम जगन्नाथराव भोसले उद्यान मध्ये आयोजित करण्यात आले असून, यापुढे सर्व धर्माचे उत्सव सर्वधर्मीयांनी एकत्र येऊन साजरे केले जाणार आहेत. इफ्तार मेळाव्याने याची सुरुवात होत असल्याची माहिती डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी सावंतवाडी…

Read More

अनुराधा केसरकर यांचे हृदयविकाराने दुःखद निधन…

सावंतवाडी ता.२३-:* अनुराधा अशोक केसरकर यांचे काल रात्री हृदयविकाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पती डॉ. अशोक केसरकर, तर मुलगे डॉ अमित केसरकर आणि डॉ. गोविंद केसरकर असा परिवार आहे. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या त्या भावजय होत्या.

Read More

महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी योजना समिती अध्यक्ष आम. चंद्रिकापुरे यांची भेट

राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबीद नाईक यांनी केले स्वागत कणकवली ता.२२-:* महाराष्ट्र शासनाच्या विधान मंडळाची रोजगार हमी योजनेची समिती सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना समिती अध्यक्ष आमदार मनोहर चंद्रिकापुरे व सदस्य आमदार विक्रम सिंह सावंत यांनी राष्ट्रवादी नेते तथा कणकवली नगरसेवक अबीद नाईक यांच्या घरी भेट दिली त्यावेळी राष्ट्रवादीच्या वतीने नाईक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ व…

Read More

मोदी सरकारच्या पोषण अभियानाचा ६ कोटीहून अधिक महिला, बालकांना लाभ

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती कणकवली ता.२२-:* गर्भवती महिला आणि बालकांसाठी मोदी सरकारने सुरु केलेल्या आरोग्य, पोषण अभियानाचा फायदा देशातील ६ कोटीहून अधिक महिला, बालकांना झाला असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली. भारतीय जनता पार्टीच्या ४२ व्या स्थापना दिनानिमित्त मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देण्याकरिता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामधून त्यांनी माहिती…

Read More
You cannot copy content of this page