मारहाण प्रकरणातील दोन संशयित आरोपींची जामिनावर सुटका

मालवण ता.२३-:* मारहाण व चोरी प्रकरणी दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत असलेल्या संशयित आरोपी उदय सुधाकर नार्वेकर (४५), विनोद गोपाळ नार्वेकर (५१ रा. काळसे बागवाडी) या दोघा संशयितांची जामिनावर सुटका झाली आहे. काळसे बागवाडी येथील उल्हास नारायण नार्वेकर यांच्या कारखान्याच्या जागेच्या मालकीवरून झालेल्या वादात उदय सुधाकर नार्वेकर, विनोद गोपाळ नार्वेकर यांनी उल्हास नार्वेकर यांना मारहाण केल्याप्रकरणी तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणी दोन्ही संशयितांना दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयासमोर हजर केले असता पोलिसांनी पुन्हा पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, बचाव पक्षातर्फे करण्यात आलेला युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरून संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली. संशयित आरोपींच्यावतीने बचाव पक्षातर्फे जामिनासाठी अर्ज दाखल केल्यानंतर दोघाही संशयितांची ३० हजार रुपयांचा सशर्थ जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. उदय नार्वेकर याच्यावतीने ऍड. स्वरूप नारायण पई व ऍड. अंबरीष गावडे यांनी तर विनोद नार्वेकर याच्यावतीने ऍड. विरेश राऊळ व ऍड. जावेद सय्यद यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page