किल्ले रामगड येथे १ मे रोजी स्वराज्याचा आनंद सोहळा

मालवण ता.२३-:* दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र आणि रामगड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक किल्ले रामगड येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रविवार १ मे रोजी ‘स्वराज्याचा आनंद सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने २०१५ साली गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘किल्ले रामगड’चे संवर्धन करण्याचा विडा उचलला. आजमितीला त्यांच्या शिवकार्याला ७ वर्षे पूर्ण होत आहेत.

चारही बाजूनी झाडी झुडपांमध्ये लुप्त होत असलेला रामगड किल्ला दुर्गवीर प्रतिष्ठानच्या पुढाकाराने मोकळा श्वास घेत असून दुर्गवीर व रामगड ग्रामस्थ यांनी महाराष्ट्र दिनी किल्ले रामगड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात १ रोजी सकाळी ९ वाजता रामगड बाजारपेठ ते रामगड किल्ला पालखी मिरवणूक होणार असून यावेळी साहसी खेळांचे सादरीकरण होणार आहे. १०.३० वाजता गड पूजन व छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन, ११ वाजता स्वागत समारंभ व गडकिल्ले छायाचित्र प्रदर्शन उदघाटन, सायंकाळी ७ वाजता दीपोत्सव व मशालोत्सव आदी कार्यक्रम होणार आहेत. स्वराज्याच्या हा आनंद सोहळा द्विगुणित करण्यासाठी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page