राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेचा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे आज समारोप…

अर्चना घारे यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी तालुक्यातून शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते कोल्हापूर येथे रवाना

सावंतवाडी ता.२३-:* राष्ट्रवादी काँग्रेसची सुरू असलेल्या परिवार संवाद यात्रेचा आज कोल्हापूर येथे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप होत असून, या कार्यक्रमासाठी आज सावंतवाडी तालुक्यामधील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सावंतवाडी विधानसभा अध्यक्षा अर्चना घारे परब यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे रवाना झाले आहेत.

या बाबतची माहिती राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांनी दिली असून, सावंतवाडीहुन कोल्हापूर येथील यात्रेसाठी जाण्यापूर्वी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गाड्या मार्गस्थ झाल्या आहेत. यावेळी अर्चना घारे परब यांनी संकल्प यात्रेसाठी घेतलेल्या पुढाकाराचा प्रविण भोसले कौतुक करत त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

यावेळी महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणेंतालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, हिदायतुल्ला खान, आसिफ शेख, आशिष कदम, हर्षद बेग, इफ्तीगार राजगुरू आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते

You cannot copy content of this page