ग्रामस्थांच्या पुढाकारातून पालकर व्हाळावर चार ते पाच फूट उंचीचा बंधारा; तीन वाड्यांना होणार पाण्याचा लाभ” ..
वैभववाडी प्रतिनिधी
जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी ग्रामपंचायत कोसकिसरे व ग्रामस्थांच्या वतीने पालकरवाडी येथील नदीच्या मुख्य उगम स्थाना जवळ पालकर व्हाळावर वनराई बंधारा बांधण्यात आला.
ग्रामस्थांनी पिशवीमध्ये वाळू माती भरून पिशवीच्या साह्याने सुमारे चार ते पाच फूट उंचीचा वनराई बंधारा बांधला या पाण्याचा उपयोग पालकरवाडीसह जवळच्या दोन वाड्यांना होणार आहे आणि या पालकर वहाळावर कोकिसरे गावातील मुख्य नदीचे उगम असल्याने या वनराई बंधाऱ्यामुळे गावातील इतर नद्यांना पाणी राहणार आहे. या उद्देशाने ग्रामस्थांनी नदीच्या मुख्य उगम स्थानावरच बंधारा बांधून पाणी अडवण्याचे काम केले
यावेळी प्रशासक डॉ शिरसाट ग्राम विकास अधिकारी संभाजी वाघमोडे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष -गौरेश पालकर, माजी सरपंच दत्ताराम सावंत, माजी सरपंच प्रदीप नारकर, अवधूत नारकर पोलिस पाटील समिधा सावंत, दाजी पाटणकर अंगणवाडी सेविका,विलास वळंजू,परेश सावंत, अखंड पालकर वाडीतील ग्रामस्थ अशा सेविका जाधव, नारकर आधी ग्रामस्थ कर्मचारी उपस्थित होते.

