Headlines

“युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त तळवडे येथे आयोजित महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी, ता. १६-: वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून त्यातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संदेश देत भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘बुकेऐवजी बंधारा आणि पोस्टरऐवजी आरोग्यसेवा’ या संकल्पनेतून आरोग्यसेवा आणि जलसंधारणाला प्राधान्य देण्यात आले असून, तळवडे येथे आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सप्टेंबर महिन्यात सेवा अभियान राबविण्यात आले होते. त्याच उपक्रमाचा पुढील टप्पा म्हणून विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध जिल्हा परिषद मतदारसंघांत महाआरोग्य शिबिरे तसेच लोकसहभागातून कच्चे बंधारे उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तळवडे येथे आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते झाले. मराठा समाज ऐक्यवर्धक मंडळ, तळवडे यांच्या वतीने आयोजित या शिबिराचा तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसाऐवजी ‘सेवेचा उत्सव’ वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून तोच निधी समाजातील गरजू घटकांसाठी विधायक कामासाठी वापरण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवत आरोग्यसेवा आणि जलसंधारणाच्या माध्यमातून सेवा करण्याचा हा उपक्रम असल्याने त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावेळी व्यासपीठावर ॲड. अनिल निरवडेकर, युवा नेते विशाल परब, माजी पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर, निरवडेचे माजी सरपंच हरी वारंग, बाळा तळकर, सामाजिक कार्यकर्ते नारायण ऊर्फ बाळा जाधव, आप्पा परब, सुहास पिकुळकर, अण्णा मालवणकर, लवू परब, शाम कुंभार, विकास गावडे, नम्रता गावडे, मंगलदास पेडणेकर, स्मिता परब, प्रवीण लोके, सुशांत गावडे, ग्रामविकास अधिकारी सद्गुरू गावडे, शंकर सावंत, बाळा भगत, शाम शेटकर आदी मान्यवर उपस्थित होते.”

You cannot copy content of this page