⚡वैभववाडी ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.नितेश राणे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वैभववाडी तालुका व्यापारी संघटना यांच्या कडून बंधारे बांधण्यासाठी 2900 पिशव्या पंचायत समिती वैभववाडी गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ यांचेकडे शुक्रवारी सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी ,जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्ष संजय सावंत, व्यापारी मंडळ तालुका अध्यक्ष तेजस आंबेकर, तसेच मनोज सावंत, संतोष कुडाळकर, लवू पारकर, रवी सांगावेकर, वसंत पटेल, रवींद्र पाटील आधी व्यापारी उपस्थित होते.

