मालवण नगरपालिकेच्या ताफ्यातील नव्या अग्निशमन बंबाचे लोकार्पण
*⚡मालवण ता.१२-:* मालवण नगरपालिकेचा अग्निशमन बंब नादुरुस्त होऊन निर्लेखीत केल्यानंतर सुमारे दोन वर्षानंतर मालवण नगरपालिकेच्या ताफ्यात नवा अत्याधुनिक अग्निशमन बंब दाखल झाला असून त्याचे लोकार्पण आज मालवण नगरपरिषद येथे आम. वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. शासनाच्या जुन्या धोरणानुसार एकदा एखाद्या नगरपालिकेस अग्निशमन बंब दिल्यावर पुन्हा देता येत नसल्याने याबाबत पाठपुरावा करून धोरणात…
