*⚡वेंगुर्ला ता.१२-:* वेंगुर्ला-राजवाडा येथील श्री देवी भगवतीचा संप्रोक्षण विधी दि.१४ मे रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळी ८ ते दुपारी १२.३० पर्यंत संप्रोक्षण विधी, स्थल प्राकार शुद्धी, शांती सुक्त जप, आवाहित देवता पूजन, दुपारी १२.३० ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ ते ६.३० क्रिडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, सायं. ७ वा. जय संतोषी माता दशावतार नाट्य मंडळ, मातोंड-पेंडूर (मालक-भास्कर वैद्य) यांचा ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते‘ हा नाट्य प्रयोग सादर होणार आहे. रात्रौ १०.३० वा. गिरोबा भजन मंडळ, बिबवणे (बुवा-कुणाल शिरोडकर) यांचे संगित भजन, दि.१५ मे रोजी पहाटे काकडा आरती होणार आहे. या सर्व कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन श्री भगवती मंदिर जीर्णोद्धार समिती, राजवाडा-वेंगुर्ला यांनी केले आहे.
भगवती देवीचा १४ रोजी संप्रोक्षण विधी
