अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या झाडाच्या मालकाची भेट घेऊन फांदी काढून सहकार्य करण्याची केली विनंती
सावंतवाडी ता.१२-:* काल रात्री पडलेल्या अवकाळी पावसामुळे शहरात मच्छी मार्केट जवळ इको बँक समोर असणाऱ्या जांभळाच्या झाडाची जांभळे रस्त्यावर पडून रस्ता गुळगुळीत झाल्याने दुचाकी स्लीप होऊन अपघात झाले होते. याबाबतची माहिती माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांना मिळताच त्यानी त्या ठिकाणी जाऊन त्या झाडाचे मालक तायशेटे यांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी रस्त्यावर आलेल्या फाद्यांमुळे जांभळे रस्त्यावर पडून रस्ता गुळगुळीत होऊन अपघात होत असल्याचे निदर्शनास आणून देताच. त्या झाडाच्या मालकांनी ती फादी लवकरात लवकर तोडून घेतो असे आश्वासन दिले आहे. यावेळी सुधीर आडिवरेकर यांच्या सोबत माजी नगरसेवक उदय नाईक आणि सहकारी उपस्थित होते.
