महान शाळेला क्रीडा साहित्य भेट

*⚡मालवण ता.१२-:* महान गावचे सुपुत्र, उद्योजक अविनाश शिंदे यांनी महान प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा क्रीडात्मक विकास व्हावा, या हेतूने नुकतेच क्रीडा साहित्य भेट दिले. आजी पार्वती शंकर शिंदे यांच्या स्मरणार्थ हे साहित्य भेट दिले.

सरपंच श्रीमती महानकर, उपसरपंच सुहास साळुंखे, अविनाश शिंदे, शरद शिंदे, वसंत शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा नीता चव्हाण, उपाध्यक्ष संतोष घाडी, निळकंठ घाडी, मानसी ठाकुर, मानसी शिंदे, रसिका घाडी, मुख्याध्यापिका पेडणेकर, प्रभू शाळा व्यवस्थापन समिती, पालक, प्राथमिक शाळा, विद्यार्थी आदी यावेळी उपस्थित होते.

You cannot copy content of this page