Headlines

संजय राऊतांना ईडीचे समन्स,

उद्या हजर राहण्याचे आदेश ⚡मुंबई दि.२७-: पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. सकाळी ११ वाजता चौकशीसाठी त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Read More

आरोंदा-कोल्याची भाट येथील खार बंधाऱ्याला भगदाड

हजारो एकर शेतजमीन खाऱ्यापाण्याखाली तर आसपासच्या परिसरातील घरानांही धोका ⚡सावंतवाडी ता.२७सहदेव राऊळ-: आरोंदा येथे वाघधरे मुख्य बंधाऱ्यानजीकच्या खार बंधाऱ्याला भगदाड पडून हजारो एकर शेतजमीन खाऱ्या पाण्याखाली गेली आहे..शेतीसोबत आसपासच्या परिसरातील घरानांही याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आरोंदा वाघधरे मुख्य बंधाऱ्यानजीकच्या…

Read More

आम्ही पाठिंबा काढतोय, सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगा;

शिंदे गटाचं राज्यपालांना पत्रं ⚡मुंबई दि.२७-: आम्ही ठाकरे सरकारचा पाठिंबा काढत आहोत. त्यामुळे सरकार अल्पमतात आलं आहे. त्यामुळे सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगा असं पत्रं शिंदे गटाने राज्यपालांना पाठवलं आहे.

Read More

कळसुलकर कॉलेजच्या विद्यार्थ्याचे चक्कर येऊन कोसळल्याने निधन…

सावंतवाडी,ता.२७: येथील कळसुलकर ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्याचे चक्कर येऊन कोसळल्याने याला उपचारासाठी नेत असता वाटेतच त्याचे निधन झाले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ही दुःखद घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास येथील सबनीसवाडा चढावावर घडली. याबाबतची माहिती प्रशालेच्या शिक्षिका प्रीती चिटणीस यांनी दिली.

Read More

बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात शिवसेनेचा सावंतवाडीत मोर्चा…

सावंतवाडीत सेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; दीपक केसरकर यांच्या विरोधात घोषणाबाजी… ⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी बंडखोरी केल्याने, त्याच्या विरोधात सिंधुदुर्गातील शिवसैनिक आक्रमक झाले असून, आज सावंतवाडीत शिवसेनेच्या वतीने आमदार वैभव नाईक आणि शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शिवसैनिकांनी मोर्चा काढला असून, बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली…

Read More

शाहू महाराज केवळ बोलके राजे नव्हते, ते कर्ते समाज सुधारक होते

दीपक पडेलकर:समता प्रेरणाभुमी संवर्धन समितीच्यावतीने शाहू महाराज जयंती सावंतवाडी ता.२७-: छत्रपती शिवाजी महाराजांनंतर अडीचशे वर्षांनी कोल्हापूर संस्थानातून सत्तेचा उपयोग लोककल्याणासाठी करणारा दुसरा महापुरुष म्हणजे राजश्री शाहू महाराज होय. राजर्षी शाहू महाराज हे केवळ बोलके राजे नव्हते तर खऱ्या अर्थाने कर्ते समाज सुधारक होते.महात्मा फुलेंचे ते खरे वारसदार होते. राष्ट्रवादाला व्यापक तत्वाचे अधिष्ठान प्राप्त करून देणाऱ्या…

Read More

जुना बाजार येथे घरावर गुलमोहराचे झाड कोसळल्याने छप्पराचे नुकसान

⚡सावंतवाडी ता.२७-: : दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जुना बाजार येथील घरावर काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास नगर परिषदेच्या हद्दीतील भलेमोठे गुलमोहराचे झाड कोसळल्याने शैलेश प्रभाकर नेमळेकर यांच्या छप्पराचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने नेमळेकर यांचा त्यात जीव वाचला. नेमळेकर हे जुना बाजार 2 नंबर शाळा येथील रहिवासी असून रात्री 10 च्या सुमारास नुकतेच जेवून…

Read More

वसुंधरा प्रभू शिरोडकर यांचे निधन

बांदा /प्रतिनिधी. श्रीमती वसुंधरा वसंत प्रभू शिरोडकर ( वय ७५, रा. पत्रादेवी-गोवा) यांचे गोवा -बांबोळी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे ३ मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पत्रादेवी येथील व्यावसायिक राजेश, रुपेश व निलेश यांच्या त्या मातोश्री होत.

Read More

गटार सफाई न झाल्याने मेढा- कोथेवाडा भागात पावसाचे पाणी तुंबले

⚡मालवण ता.२६-: मालवण शहरातील गटारांसह, व्हाळ्यांची पावसाळ्यापूर्वी योग्य ती साफसफाई न झाल्याने मुसळधार पावसात शहरातील मेढा, कोथेवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. पावसाचे पाणी वस्तीत घुसल्याने मेढा, कोथेवाड्यातील काही घरांना धोका निर्माण झाला आहे. व्हाळ्याची, गटारांची साफसफाई करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने स्थानिक माजी नगरसेविका ममता वराडकर यांच्यासह नागरिकांनी तीव्र…

Read More

वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणार

जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांची ग्वाही कुडाळ ता 26सिंधुदुर्ग जिल्हा वीज कंत्राटी कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी माजी जि प अध्यक्ष अशोक सावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. वीज कंत्राटी कामगारांच्या न्याय प्रश्नांसाठी माझ्या पदाचा वापर केला जाईल. कामगारांना लवकरच राज्य कामगार विमा योजना कार्ड देण्यात येणार आहे. कामगारांना काम करत असताना अपघात होऊ नये म्हणून त्यांच्या…

Read More
You cannot copy content of this page