बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात शिवसेनेचा सावंतवाडीत मोर्चा…

सावंतवाडीत सेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; दीपक केसरकर यांच्या विरोधात घोषणाबाजी…

⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी बंडखोरी केल्याने, त्याच्या विरोधात सिंधुदुर्गातील शिवसैनिक आक्रमक झाले असून, आज सावंतवाडीत शिवसेनेच्या वतीने आमदार वैभव नाईक आणि शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शिवसैनिकांनी मोर्चा काढला असून, बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात पोलिस फौज तैनात करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page