जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांची ग्वाही
कुडाळ ता 26
सिंधुदुर्ग जिल्हा वीज कंत्राटी कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी माजी जि प अध्यक्ष अशोक सावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. वीज कंत्राटी कामगारांच्या न्याय प्रश्नांसाठी माझ्या पदाचा वापर केला जाईल. कामगारांना लवकरच राज्य कामगार विमा योजना कार्ड देण्यात येणार आहे. कामगारांना काम करत असताना अपघात होऊ नये म्हणून त्यांच्या सुरक्षिततेसाठी ठेकेदाराला टूलकिट पुरवण्याच्या सूचना केल्या जातील असे श्री सावंत यानी यावेळी सांगितले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कामगार बंधू भगिनी यांची बैठक आज कुडाळ येथील मराठा समाज हॉल याठिकाणी आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांवर होणाऱ्या मानसिक त्रासाबद्दल ही मिटींग खास करून आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांच्या हीताचे निर्णय घेण्यात आले आहे. यावेळी सिंधुदुर्ग वीज कंत्राटी कामगार संघटना सिंधुदुर्गची नवीन जिल्हा कार्यकारणीची निवड सर्वानुमते करण्यात आली.
यामध्ये सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांच्या वतीने पदे विभागली गेली आहेत व त्यांचा सत्कार करण्यात आला . ही संघटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांच्या हीतासाठी काम करणार आहे. या संघटनेचे ऑफिस कुडाळ शहरात लवकरच सुरू करण्यात येणार आहे. कामगारांची दर महिन्याला मीटिंग आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्ष श्री अशोक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कंत्राटी कामगारांची कामे केली जाणार आहे. प्रत्येक तालुक्यात संघटना वाढीसाठी मीटिंग आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत अशोक सावंत यांनी बोलताना सांगितले की कामगारांना लवकरच राज्य कामगार विमा योजना कार्ड देण्यात येणार आहे. कामगारांना काम करत असताना अपघात होऊ नये म्हणून त्यांच्या सुरक्षिततेसाठी टूलकिट ठेकेदाराला पुरवण्यासाठी सांगण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग वीज कंत्राटी कामगार संघटना सिंधुदुर्ग चे पदाधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा वीज कंत्राटी कामगार संघटना सिंधुदुर्ग चे अध्यक्ष श्री अशोक सावंत, जिल्हा प्रतिनिधी-श्री. आनंद लाड, जिल्हा प्रतिनिधी-श्री.संदीप बांदेकर,
तालूका प्रतिनिधी कुडाळ डिव्हिजन सावंतवाडी- श्री. सर्वेश राऊळ, दोडामार्ग – श्री दर्शन देसाई, ओरोस- श्री. विनोद बोभाटे , वेंगुर्ला – श्री. संजय गोवेकर, कुडाळ- श्री. महेश राऊळ,
कणकवली डिव्हिजन वैभववाडी- श्री. जितेंद्र बंड, मालवण- श्री विठ्ठल साळकर . या नवीन पदाधिकारी व तालुका प्रतिनिधी यांची निवड करण्यात आली.
यावेळी सिंधुदुर्गातील वीज कामगार मोहन गावडे, अमोल वाडकर, योगराज यादव, सुधिर तेली, रघुनाथ जाधव, जयेंद्र कुंभार, श्रीकृष्ण शिर्के, संदेश देवरुखकर, राजेश सावंत, रुपेश जाधव, दिलीप गावडे, पुरुषोत्तम राणे, मंदार गोसावी, सुशांत तांबे, विश्वास घाडीगावकर, एकनाथ धवन, मनीष सावंत, सतीश जंगले, प्रथमेश नाईक, अक्षय गावकर, श्रीकांत कोमुंलेकर, बळीराम गावकर, चेतन सावंत, सुरेश तळेकर, विनय येरम, प्रवीण कांबळे, ओमकार नागवेकर, राजेश वेंगुर्लेकर, दीपक निवळे, रुपेश वंजारी, दाजी कुंभार, कृष्णा पवार, अभय जोशी, विनोद गुरव, पुरुषोत्तम राणे अनिल घाडी रुपेश उत्तम येरम आहे का इत्यादी कामगार कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
