सिंधुदुर्गनगरी ता.२६-: पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरुणाई अमली पदार्थाच्या जाळ्यात अडकू नये, यासाठी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणेमार्फत आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आज विविध ठिकाणी जनजागृती करत अमली पदार्थ पासून दूर राहण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच अमली पदार्थ संदर्भात मार्गदर्शन करणारे पोस्टर लावण्यात आली आहेत.
अमली पदार्थांच्या अति सेवनाने मेंदूमधील पेशींच्या क्रियेत बिघाड होतो. व्यसनी व्यक्ती इतरात मिसळणे टाळतो, वेगवेगळे भास होतात, त्यामुळे शारीरिक हालचालींवरील नियंत्रण सुटते, सामाजिक व आर्थिक व्यवहारांचे भान राहत नाही, विळख्यात अडकलेल्या व्यक्तीला ठरल्यावेळी ‘खुराक’ मिळाली नाही तर त्याचे शारीरिक आणि मानसिक संतुलन बिघडते- हे पदार्थ महाग असल्याने व्यसनी व्यक्ती प्रसंगी चोरीसारख्या कोणत्याही स्तरावर जातो. त्यामुळे आज आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे हद्दीत बस स्थानक, रिक्षा स्टॅन्ड ,बाजारपेठ सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या वतीने अमली पदार्थ पासून दूर राहण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पोस्टर लावण्यात आलेली आहे. तसेच गुरुकुल करियर ॲकॅडमी या ठिकाणी अमली पदार्थाच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.
यावेळी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत देवरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार गोसावी, पोलीस हेड कॉन्स्टेबल भिवाजी सावंत, पोलीस कॉन्स्टेबल कमलेश पावसकर हजर होते.
