Headlines

वृत्तपत्र विक्रेते रंजन बांदेकर यांची सायकल चोरीला

चोरटा सीसीटिव्हीत कैद सावंतवाडी ता.२२-:शहरातील बाजारपेठेत वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणारे रंजन बांदेकर यांची स्टॉल जवळ उभी करून ठेवण्यात आलेली सायकल अज्ञात चोरट्याने चोरली असून, तो चोरटा सीसी टिव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याबाबत रंजन बांदेकर यांनी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली असून, पोलिस त्या चोरट्याचा शोध घेत आहेत. ही घटना आज सकाळी दहाच्या सुमारास घडली…

Read More

तुमच्या शैक्षणिक वाटचालीला अर्चना फाऊंडेशन सर्वतोपरी मदत करणार

बांदा येथे राष्ट्रवादीच्या कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांचे आश्वासन बांदा/प्रतिनिधीविद्यार्थीदशेत भरपूर अभ्यास करा. भविष्यातील आपले ध्येय निश्चित करुन त्यानुसार मेहनत घ्या. मोठे अधिकारी, व्यवसायिक होण्याची स्वप्ने पाहून त्यानुसार शैक्षणिक वाटचाल ठेवा. त्यासाठी अर्चना फाऊंडेशन सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन अर्चना फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब…

Read More

रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंटरचा २४ रोजी पदग्रहण सोहळा

उदयकुमार जांभवडेकर अध्यक्ष, नवीन बांदेकर सचिव, व्हिक्टर फर्नांडिस खजिनदार ⚡ओरोस ता.२२-: रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंत्रालच्या अध्यक्षपदी उदयकुमार जांभवडेकर, सचिवपदी नवीन बांदिवडेकर, खजिनदार पदी व्हिक्टर फर्नांडिस यांची निवड केली जाणार आहे. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा २४ जुलै रोजी सिंधुदुर्गनगरी ओरोस फाटा येथील ईच्छा पूर्ती हॉल मध्ये सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी होणार आहे, अशी…

Read More

महेश कलंबिस्तकर यांचे निधन

⚡सावंतवाडी ता.२२-: कलंबिस्त इंग्लिश स्कूल कलंबिस्त येथील चतुर्थ श्रेणी कर्मचारी महेश विश्राम कलंबिस्तकर (वय ४८) यांचे शुक्रवारी निधन झाले.गेली सहा वर्षे ते कलंबिस्त हायस्कूलमध्ये मानधन तत्वावर कार्यरत होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच शालेय कामकाज बंद ठेवण्यात आले. अत्यंत प्रामाणिक व मनमिळावू कर्मचारी आम्ही गमावला अशा शब्दात संस्थाध्यक्ष शिवाजी सावंत यांनी आपल्या दुखःद भावना व्यक्त केल्या….

Read More

ज्युनिअर न्यूटन टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर

⚡कणकवली ता.२२-: ज्युनिअर न्यूटन टॅलेंट सर्च या राज्यस्तरीय शाळाबाह्य स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या स्पर्धा परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. राज्यस्तरीय गुणवत्ता यादीतील विद्यार्थी पुढीलप्रमाणे १) दुर्वा किशोर सावंत ( इयत्ता दुसरी .१९६ गुण.( जि.प. नरडवे. कोकेवाडी.)२) अस्मिता सतिश गोसावी. इयत्ता दुसरी. १९२ गुण.( जि. प. नरडवे. कोकेवाडी…

Read More

मालवण बंदरी माशांचा दर वधारला

मोरी साडेतीनशे रुपये किलो तर बांगडा बाराशे रुपये टोपली भावाने विक्री मालवण दि प्रतिनिधीमासेमारी बंदी कालावधी सुरू असतानाही मालवण बंदरात सलग आज चौथ्या दिवशी मोरी या माशाची मोठी आवक झाली मालवणच्या समुद्र किनारी भरलेल्या लिलावाच्या ठिकाणी तर मोरी साडेतीनशे रुपये किलो भावाने विकली गेली असून मोरीचा हा भाव गेले चार दिवस स्थिर आहे एकीकडे ही…

Read More

मडुरा पंचक्रोशीसह आरोस परिसरातील वीज समस्या सुटणार

रोणापाल ग्रामपंचायत सभागृहात अधीक्षक अभियंत्याचे सरपंच सुरेश गावडे यांना आश्वासन ⚡बांदा ता.२२-: पावसाळा सुरू झाल्यापासून वारंवार उद्भवणारी वीज समस्या अजूनही कायमच आहे. लेखी निवेदने, उपोषण, घेराव घालूनही वीज वितरण विभागाला जाग येत नसल्याने ग्राहक हतबल झाले असून वीज समस्या कधी मार्गी लावणार असे सांगत रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी महावितरणच्या कामावर अधिकाऱ्यांसमोरच ताशेरे ओढले. सर्व…

Read More

कोळसावाहू मालवाहू गाडीचे चार डबे सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर सुटले

सुदैवाने मोठा अनर्थ टळला सावंतवाडी: प्रतिनिधीगोव्याच्या दिशेने जात असलेल्या कोळसावाहू मालवाहू गाडीचे चार डबे सुटून स्टेशनवर राहिले. दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्टेशनपासून अलिकडे या गाडीच्या काही लोखंडी पट्टी खांबाला अडकून मोठा आवाज झाला. त्यानंतर चार डबे सुटले. या डब्यांच्या मागे गार्ड केबिनही नव्हती. या दरम्यान कोणतीही रेल्वे गाडी नसल्याने सुदैवाने मोठा अनर्थ…

Read More

साळगाव विद्यालयात उद्या रानभाज्यांचे प्रदर्शन

⚡सावंतवाडी ता.२२-: कुडाळ तालुक्यातील साळगाव येथील शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना परिसरातील रानभाज्यांची ओळख व्हावी या उद्देशाने उद्या शनिवार दिनांक २३ जुलै २०२२ रोजी सकाळी ११ वाजता विद्यालयामध्ये ‘रानभाज्यांचे प्रदर्शन’ आयोजित केले आहे. या प्रदर्शनसाठी प्रा. डॉ. परेश पोटफोडे (अधिव्याख्याता उद्यान महाविद्यालय मूळदे) यांचे मार्गदर्शन, तसेच संस्थाध्यक्ष प्रदीप प्रभूतेंडोलकर तसेच संस्था सचिव…

Read More

यात्रा काढून संभ्रम निर्माण केलात तरी आमचीच शिवसेना खरी

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पुन्हा ठाकरेंना डिवचले ⚡मुंबई दि.२२-: तुम्ही कितीही यात्रा काढा, लोकांच्या मनात कितीही संभ्रम निर्माण करा. आमची शिवसेना खरी असल्याचा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेत म्हटलं की, आमची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. एकनाथ शिंदे यांची बदनामी का सुरू आहे….

Read More
You cannot copy content of this page