कोळसावाहू मालवाहू गाडीचे चार डबे सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर सुटले

सुदैवाने मोठा अनर्थ टळला

सावंतवाडी: प्रतिनिधी
गोव्याच्या दिशेने जात असलेल्या कोळसावाहू मालवाहू गाडीचे चार डबे सुटून स्टेशनवर राहिले. दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्टेशनपासून अलिकडे या गाडीच्या काही लोखंडी पट्टी खांबाला अडकून मोठा आवाज झाला. त्यानंतर चार डबे सुटले.

या डब्यांच्या मागे गार्ड केबिनही नव्हती. या दरम्यान कोणतीही रेल्वे गाडी नसल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर गाडी थांबविण्यात आली. रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. नंतर त्यानी डबे जोडून गाडी पूर्ववत केली.

You cannot copy content of this page