⚡सावंतवाडी ता.२२-: कुडाळ तालुक्यातील साळगाव येथील शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना परिसरातील रानभाज्यांची ओळख व्हावी या उद्देशाने उद्या शनिवार दिनांक २३ जुलै २०२२ रोजी सकाळी ११ वाजता विद्यालयामध्ये ‘रानभाज्यांचे प्रदर्शन’ आयोजित केले आहे. या प्रदर्शनसाठी प्रा. डॉ. परेश पोटफोडे (अधिव्याख्याता उद्यान महाविद्यालय मूळदे) यांचे मार्गदर्शन, तसेच संस्थाध्यक्ष प्रदीप प्रभूतेंडोलकर तसेच संस्था सचिव मुकुंद धुरी व सर्व संस्था पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तरी या प्रदर्शनास विद्यार्थी, पालक तसेच साळगाव परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून प्रदर्शनाची शोभा वाढवावी, तसेच मुख्य मार्गदर्शक प्रा. डॉ. परेश पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाचाही लाभ घ्यावा, असे आवाहन साळगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक सलीम तकीलदार व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधवांनी केले आहे.