चोरटा सीसीटिव्हीत कैद
सावंतवाडी ता.२२-:शहरातील बाजारपेठेत वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणारे रंजन बांदेकर यांची स्टॉल जवळ उभी करून ठेवण्यात आलेली सायकल अज्ञात चोरट्याने चोरली असून, तो चोरटा सीसी टिव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याबाबत रंजन बांदेकर यांनी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली असून, पोलिस त्या चोरट्याचा शोध घेत आहेत. ही घटना आज सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे.
