सावंतवाडी : येथील जेष्ठ पत्रकार, कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेलचे संपादक, सकल मराठा व हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांचा व्दितीय पुत्र समर्थ सीताराम गावडे (वय १६) याचे बुधवारी रात्री १० वाजता दुःखद निधन झाले. त्याच्या पश्चात आई संयुक्ता, वडील सीताराम, भाऊ साईश, बहिणी, काका, काकी असा मोठा परिवार आहे.
समर्थ गेली पंधरा वर्षे मेंदु विकाराने अंथरुणावर होता. त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन उपचारही करण्यात आले होते. जन्माच्या तिसऱ्या दिवशी त्याच्या छोट्या मेंदूला इजा पोहचल्याने तो अंथरुणावरच होता. आज अखेर त्याची प्राणजोत मालवली. बुधवारी रात्री उशिरा येथील उपरल स्मशानभूमीत त्यांच्यावर अ़त्यसंस्कार करण्यात आले.
ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांचे चिरंजीव समर्थ गावडे याच दुःखद निधन…
