रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंटरचा २४ रोजी पदग्रहण सोहळा

उदयकुमार जांभवडेकर अध्यक्ष, नवीन बांदेकर सचिव, व्हिक्टर फर्नांडिस खजिनदार

⚡ओरोस ता.२२-: रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंत्रालच्या अध्यक्षपदी उदयकुमार जांभवडेकर, सचिवपदी नवीन बांदिवडेकर, खजिनदार पदी व्हिक्टर फर्नांडिस यांची निवड केली जाणार आहे. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा २४ जुलै रोजी सिंधुदुर्गनगरी ओरोस फाटा येथील ईच्छा पूर्ती हॉल मध्ये सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी होणार आहे, अशी माहिती क्लबचे मावळते अध्यक्ष डॉ प्रशांत कोलते व नवीन अध्यक्ष उदयकुमार जांभवडेकर, पदाधिकारी प्रभाकर सावंत यांनी दिली.
सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेत रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंत्रालच्या पदाधिकारी यांनी ही माहिती दिली. पदग्रहण सोहळ्याला प्रशांत मेहता पदग्रहण अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रणय तेली, गजानन कांदळगावकर, दीपक बेलवलकर, निता गोवेकर आदी रोटरीयन तसेच रानबांबुळी सरपंच वसंत बांबुळकर, माजी अध्यक्ष डॉ प्रशांत कोलते, पदग्रहण कार्यक्रम अध्यक्ष प्रभाकर सावंत आदींसह जिल्ह्यातील ११ रोटरी क्लबचे पदाधिकारी व रोटरीयन उपस्थित राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पुढे बोलताना रोटरी पदाधिकाऱ्यांनी नवीन कार्यकारिणी २८ जणांची आहे. यात डॉ प्रशांत कोलते, हेमंत बागवे, सत्यवान चव्हाण, अरुण मालणकर, दीपक आळवे, उल्हास पालव, प्रवीण मोरजकर, प्रभाकर सावंत, डॉ वैभव आईर, शंकरराव कोकितकर, डॉ दर्शना कोलते, डॉ सिद्धार्थ परब, समीर परब, अभिजित जैतापकर, अतुल बागवे, मयुरी जैतापकर, सिद्धांत सावंत, भालचंद्र सावंत, रविकमल डांगी, डॉ वैद्यही आईर, आनंद मसुरकर, व्यंकट मनस्पुरे, गौरव चौगुले, मिलिंद कुलकर्णी यांचा समावेश आहे. पदग्रहण सोहळ्यावेळी जलतरणपटू पूर्वा गावडे, श्रावणी पालव, प्रसाद परब व जिल्हा क्षय रोग विभाग यांचा फेलोशिप पुरस्कार देवून सत्कार करण्यात येणार आहे. तसेच तसेच कल्पेश कदम यांचा व्हेकेशन पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page