⚡सावंतवाडी ता.२२-: कलंबिस्त इंग्लिश स्कूल कलंबिस्त येथील चतुर्थ श्रेणी कर्मचारी महेश विश्राम कलंबिस्तकर (वय ४८) यांचे शुक्रवारी निधन झाले.
गेली सहा वर्षे ते कलंबिस्त हायस्कूलमध्ये मानधन तत्वावर कार्यरत होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच शालेय कामकाज बंद ठेवण्यात आले. अत्यंत प्रामाणिक व मनमिळावू कर्मचारी आम्ही गमावला अशा शब्दात संस्थाध्यक्ष शिवाजी सावंत यांनी आपल्या दुखःद भावना व्यक्त केल्या. सचिव यशवंत राऊळ, सहसचिव चंद्रकांत राणे, मुख्याध्यापक अभिजित जाधव व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही महेश कलंबिस्तकर यांना श्रद्धांजली वाहिली.
सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक विश्राम कलंबिस्तकर यांचे ते चिरंजीव होते. तसेच कलंबिस्त हायस्कूलचे सेवानिवृत्त शिपाई मधुकर कदम यांचे मामेभाऊ होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार वर्षाचा मुलगा, दोन भाऊ, भावजयी पुतणे, पुतण्या असा परिवार आहे.
महेश कलंबिस्तकर यांचे निधन
