Headlines

कोंकणातील पर्यटनासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्नशील

येथील कला, संस्कृती, परंपरा व पर्यटन स्थळांची बनविणार माहितीपट;प्रसार भारतीचा पुढाकार: व्यावसायिक महासंघाच्या नकुल पार्सेकर यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.१६-: केद्रस्तरावर कोकणातील पर्यटनसाठी विशेष प्रयत्न केले जात असून जिल्ह्यातील परंपरागत कला, संस्कृती याचा ग्लोबल प्रचार व प्रसार व्हावा यासाठी प्रसारभारतीचा चमु दिनांक १९ व २० सप्टेंबर रोजी जिल्ह्यात येवून अशा परंपरागत कला जोपसणारे कारागीर, व्यवसायिक यांच्यावर…

Read More

न्याहरी-निवास व्यावसायिकांसाठी देवबागला २८ रोजी कार्यशाळा

⚡मालवण ता.१६-: केंद्रीय पर्यटन मंत्रालय आणि पर्यटन व्यावसायिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने न्याहरी – निवास व्यावसायिकांसाठी २८ सप्टेंबर रोजी देवबाग येथील समर्थ सिनेमागृह येथे अतिथी गृह व्यवस्थापन तसेच वर्तन कौशल्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक, भारत पर्यटनचे संचालक व्यंकटेशन दत्तात्रेयन, भारत पर्यटनच्या माजी संचालक नीला लाड, उपसंचालक जगदीप ठोंबरे,…

Read More

प्रि.एम. आर. देसाई इंग्लिश मिडीयम स्कुल च्या विद्यार्थ्यांचे गणित संबोध परीक्षेत १००% यश

⚡वेंगुर्ले ता.१६-: शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचालित प्रिं. एम आर. देसाई इंग्लिश मिडीयम स्कुल, वेंगुर्लाच्या विद्यार्थ्यांनी गणित संबोध परीक्षेत प्रथम श्रेणी सह उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन केले आहे.या परीक्षेत प्रशालेच्या इयत्ता ५वी, व ८ वी चे एकूण 9 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत शाळेने १००% यश संपादन केले आहे. शाळेतील…

Read More

कोळपे बौद्धवाडीतील ३२ वर्षीय तरुणाचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

वैभववाडी प्रतिनिधी   कोळपे बौध्दवाडी येथील श्रीधर धोंडू कांबळे या ३२ वर्षे वयाच्या तरुणाचे हृदयविकाराच्या तीव्र धक्याने आकस्मिक निधन झाले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.     श्रीधर कांबळे याला सकाळी छातीत दुखू लागल्यामुळे मिञाच्या मोटारसायकलवरुन उंबर्डे  प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आला. त्याठिकाणी प्राथमिक उपचार करुन अधिक उपचारासाठी त्याला वैभववाडी येथे खाजगी डाॕक्टरकडे उपचारासाठी…

Read More

सावंतवाडी शिरोडा आरोंदा वस्तीची बस येत नाही वेळेत

प्रवाशांचे हाल: एसटी नियंत्रक कक्षातून दिली जातात उद्धट उत्तरे;मनसेने एसटी प्रशासनाची भेट घेत विचारला जाब सावंतवाडी – आरोंदा जाणारी रात्री 8 वा वस्तीची सावंतवाडी शिरोडा आरोंदा ही एसटी बस गेली महिनाभर उशिराने सुटत असल्याने कामाला ये-जा करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. यात महिला आणि तरुणींची संख्या मोठी असून ही बस सावंतवाडी आगारातून वेळेत सुटत…

Read More

मडकईवाडा वझरी येथील अपघातात महिला जागीच ठार

वडीलांच्या श्राद्धाला जाताना काळाचा घाला बांदा/प्रतिनिधीमडकईवाडा-वझरी (ता. पेडणे) येथे काल सायंकाळी उशिरा दुचाकी व ट्रक या दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात दुर्गाई सुरेश सावंत (वय ५२, रा. इन्सुली) येथील महिला जागीच ठार झाली. वडिलांचे आज श्राद्ध असल्याने भावासोबत ती दुचाकीवरून (मागे बसून) माहेरी जात होती. घर केवळ ३०० मीटर अंतरावर असतानाच हा अपघात घडल्याने हळहळ व्यक्त…

Read More

वेदांतां फॉक्सकॉम कंपनीसाठी युवा सेनेकडून निषेध

दोडामार्ग ता.१५-: दोडामार्ग तालुक्यातही वेदांता फॉक्सकॉन कंपनीचा १:४५ लाख कोटींचा महाराष्ट्रातील साधारण एक लाखापेक्षा अधिक युवकांना रोजगार मिळवून देणारा प्रकल्प गुजरातला गेल्याबद्दल युवासेनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी हे सरकार “खोके” सरकार असल्याचा आरोप युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे यांनी केला. सदरची स्वाक्षरी मोहीम युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच युवासेना विस्तारक अमित पेडणेकर,…

Read More

निलेश राणे यांच्या व्यायाम शाळेतील साहित्याच्या आरोपात तथ्य नाही

मंदार केणी यांनी मांडली आ नाईक यांची बाजू मालवण दि प्रतिनिधीमालवण येथील नगरपालिकेच्या व्यायाम शाळेसाठी ठेकेदाराने उपलब्ध करून दिलेल्या साहित्यात त्रुटी असल्याचे लोकार्पणाच्या दिवशीच निदर्शनास आले. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी संबंधित ठेकेदाराला साहित्यातील त्रुटी दूर करण्याचे आदेश देत जोपर्यंत या त्रुटी दूर होत नाहीत तोपर्यंत ठेकेदाराला बिल अदा न करण्याच्या सूचना नगर पालिका प्रशासनास…

Read More

शास्त्रीय पकवाद वादन स्पर्धेत आरे गावच्या यश मेस्त्री ने पटकावला प्रथम क्रमांक…

देवगड-प्रतिनिधीनुकत्याच रायगड जिल्हयामध्ये झालेल्या शास्त्रीय पकवाद वादन स्पर्धेमध्ये तालुक्यातील आरे गावचे सुपुत्र यश प्रकाश मेस्त्री याने प्रथम क्रमांक प्राप्त करीत आरे गावचे नाव उज्वल केले आहे. रायगड जिल्हयामध्ये शास्त्रीय पकवाद वादन स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग या जिल्हयातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. देवगड तालुक्यातील आरे गावचे सुपुत्र यश मेस्त्री याने उत्कृष्ट असे…

Read More

मालवण नगरपरिषदेतर्फे १७ रोजी समुद्र किनारा स्वच्छता मोहीम

⚡मालवण ता.१५-: कचरा मुक्त शहर हि संकल्पना अधिक व्यापकतेने राबविण्यासाठी आणि स्वच्छते बाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने (Ministry of Housing & Urban Affairs) स्वच्छ अमृत महोत्सव या कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे. या कार्यक्रमांतर्गत दि. १७ सप्टेंबर रोजी Indian Swachhata League अंतर्गत Rally of Youth for Garbage Free Beaches, Hills and…

Read More
You cannot copy content of this page