शिरोडा येथून आजादी गौरव पदयात्रा
राष्ट्रीय काँग्रेसचे आयोजन वेंगुर्ला प्रतिनिधी – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त अखिल भारतीय काँग्रेसने संपूर्ण देशात ‘आजादी गौरव पदयात्रा‘ क्रांतीदिनी म्हणजेच ९ ते १४ ऑगस्टपर्यंत प्रत्येक तालुक्यात काढण्याचे आदेश दिले आहेत. वेंगुर्ला तालुक्यातील या पदयात्रेची सुरुवात महात्मा गांधींनी ज्या गावात मिठाचा सत्याग्रह केला त्याच शिरोडा गावातून केला. या पदयात्रेत युवकांबरोबर महिला सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
