कासार्डे विद्यालयात आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत समुह राष्ट्रगान

⚡कणकवली ता.१०-: कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे व ग्रामपंचायत कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत आणि ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून स.११वा समूह राष्ट्रगानचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, कासार्डे गावचे सरपंच बाळाराम तानवडे, ग्रामविकास अधिकारी श्री. कोलते, विद्यालयाचे प्राचार्य एम.डी.खाड्ये, पर्यवेक्षक एन.सी. कुचेकर, ग्रा.प सदस्य गणेश पाताडे,ग्रा.प.चे कर्मचारी विद्या नकाशे, श्रुती पास्टे,जयेश पाटील श्री.आयरे, अंगणवाडी सेविका तसेच कासार्डे माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

You cannot copy content of this page