स्वातंत्र्यवीर, समाजसेवक, क्रांतिकारक यांच्या माहितीपर ग्रंथाचे प्रदर्शन युवा पिढीला मार्गदर्शक

भिकाजी सामंत;मळगाव येथील कै. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरात ग्रंथ प्रदर्शन सोहळा संपन्न

⚡सावंतवाडी ता.१०सहदेव राऊळ-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर, समाजसेवक, क्रांतिकारक यांच्या माहितीपर ग्रंथाचे प्रदर्शन युवा पिढीला मार्गदर्शक ठरेल, कै. उदय खानोलकर वाचन मंदिराने राबविलेला हा एक स्तुत्य उपक्रम आहे, असे प्रतिपादन ग्रंथ प्रदर्शन उदघाटनप्रसंगी मळगाव हायस्कूलचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक श्री भिकाजी सामंत यांनी केले.

मळगाव येथील कै. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरात राष्ट्र्प्रेम व क्रांतीरांवरील पुस्तकांचे प्रदर्शन सोहळा संपन्न झाला. या ग्रंथ प्रदर्शनाचे दिपप्रज्वलन श्री. भिकाजी सामंत व श्री. यशवंत राऊळ यांच्या हस्ते झाले. यावेळी वाचन मंदिराचे अध्यक्ष श्री हेमंत खानोलकर, सचिव श्री. गुरुनाथ नार्वेकर, उपाध्यक्ष श्री. बाबली नार्वेकर, संचालक श्री. महेश पंतवालावलकर, सौ. स्नेहा खानोलकर, ग्रंथपाल श्री. आनंद देवळी, सौ. पूर्वा नार्वेकर उपस्थित होते. यावेळी वाचनालयाचे सचिव श्री. नार्वेकर यांनी प्रास्ताविक करून वाचनालय करीत असलेले उपक्रम व स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाविषयीच्या कार्यक्रमाची माहिती सांगितली. हे ग्रंथ प्रदर्शन १७ ऑगस्टपर्यंत खुले राहणार असून याचा लाभ विद्यार्थी वर्गाने व वाचकांनी घ्यावा, असे आवाहन वाचनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page