खालची बाजारपेठ विठ्ठल मंदिरात हरिनाम सप्ताहात प्रारंभ

देवगड
येथील खालची बाजारपेठ श्री विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे सप्तप्रहरांचा श्री हरिनाम सप्ताहास बुधवारी सकाळी १० वाजलेपासून उत्साहात सुरुवात झाली.या मंदिराचे मानकरी अनिकेत दिलीप पारकर यांच्या हस्ते ग्रामोपाध्ये प्रथमेश बोंडाळे यांचे पौरोहित्यखाली विधीवत पूजन करून घटस्थापना करण्यात आली .त्यानंतर आरती गाऱ्हाणे होऊन आनंदवाडी ग्रामस्थ भजन मंडळ यांनी मानाप्रमाणे श्री हरिनाम सप्ताहास प्रारंभ केला.
या वेळी आनंदवाडी गावचे पाटील सुरेश धुरी आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष प्रदीप कोयंडे, देवगड माजी सरपंच बाळासाहेब ढोके, श्री विठ्ठल मंदिर श्री हरिनाम सप्ताह समितीचे सुनील पारकर,उत्तम पोकळे, आनंद कुळकर्णी, महेंद्र पारकर,प्रशांत पोकळे,रोहन शिरसाट,अनिल कोरगावकर,भाऊ पारकर,मकरंद शिरसाट ,व अन्य उपस्थित होते.
या नंतर स्थानिक महिला भजन मंडळ ,अन्य भजनी मंडळांनी क्रमशः हरिनामाचा गजर केला.साय.७ वाजले पासून आकर्षक चित्ररथासह ढोल ताशा लेझीम नृत्यासह दिंडी सोहळा देवगड मुख्य बाजारपेठ ते खालची वाडी श्री विठ्ठल मंदिर पर्यंत निघणार आहे.यात ५ मंडळे सहभागी होणार आहेत.भाविकांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

You cannot copy content of this page