जिल्हा परिषदेच्या स्वच्छ्ता रॅलीला मोठा प्रतिसाद

राजधानीत सीईओ प्रजीत नायर सुद्धा झाले सामील

सिंधुदुर्गनगरी ता १०
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषद व पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, यांच्या वतीने महामार्गावरील ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन मुंबई गोवा महामार्ग स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली होती. यावेळी तळेरे ते ओरोस दरम्यान जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा यांच्या उपस्थितीत स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सिंधुदुर्ग नगरी येथे जिल्हाधिकारी श्रीम. के. मंजुलक्ष्मी,
यांनीही या रॅलीत सहभाग नोंदवित जिल्हा परिषदेच्या उपक्रमाला शुभेस्च्या दिल्या.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे जिल्हा, तालुका व ग्रामपातळीवर आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणुन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातुन खारेपाटण, ता. कणकवली ते बांदा, तालुका सावंतवाडी दरम्यान मुंबई गोवा महामार्गाची स्वच्छता आज १० ऑगस्ट रोजी करण्यात आली. यामध्ये मुंबई- गोवा महामार्गालगत असणा-या सर्वच ग्रामपंचायतीनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, हर घर तिरंगा व स्वच्छता कार्यक्रम याबाबत प्रचार प्रसिध्दी करीता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या प्रमुख उपस्थितित रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा) राजेंद्र पराड़कर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा), विशाल तनपुरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, (पाणी व स्वच्छता) विनायक ठाकुर, गटविकास अधिकारी, कणकवली अरुण चव्हाण, गट विकास अधिकारी कुडाळ विजय चव्हाण, यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी ,शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तळेरे ते ओरोस दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या रॅलीचा शुभारंभ तळेरे ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन तळेरे बसस्थानका समोर करण्यात आला. तेथिल परिसराची स्वच्छता करुन स्वच्छता रॅली नादगाव, हुमरट, बेळणे, जानवली, कलमठ, प. स. कणकवली, वागदे, ओसरगाव, कसाल, ओरोस मार्गे जिल्हा परिषद मुख्यालय येथे समारोप करण्यात आला. रॅली मार्गातील ग्रामपंचायतीनी स्वच्छता कार्यक्रमाबरोबरच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या घोषणा, पथनाट्य, राष्ट्रभक्तीपर गीत आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी रॅली मार्गावरील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्राप सदस्य, लोकप्रतिनिधी, शिक्षक, ग्रामसेवक व ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page