⚡कणकवली ता.१०-: जागतिक आदिवासी दिनानिमित्त कणकवली तालुका ठाकर समाज,कणकवली आयोजित वार्षिक गुणगौरव सोहळा आशिये, ठाकरवाडी समाजमंदिर येथे पार पडला. यावेळी कणकवली तालुका ठाकर समाज आदिवासी दीन साजरा साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चार्टर अकाऊंटंट दामोदर खानोलकर , सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज अध्यक्ष,भगवान रणसिंग,
सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज कार्याध्यक्ष निलेश ठाकूर , सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज कणकवली अध्यक्ष वैभव ठाकूर , जिल्हा सल्लागार. नामदेव ठाकूर , तालुका सचिव निलेश गवाणकर ,
महापुरुष मित्र मंडळ अध्यक्ष उमेश ठाकूर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने विकासासाठी आवश्यक ते सहकार्य निश्चितपणे दिले जाईल अशी ग्वाही दिली.
