⚡दोडामार्ग ता.१०-: गेल्या काही वर्षांत दोडामार्ग तालुक्यात काही परराज्यातील मंडळी स्थानिक माहिती गार लोकांना हाताशी धरून जंगली वन्य प्राणी यांची शिकार करणे या घटना वाढल्या आहेत त्यामुळे वन विभाग आता सतर्क झाले आहे.पणतुर्ली गावात शेताच्या ठिकाणी जंगली गवारेडा कळप ये जा करत असल्याचे लक्षात येतात या ठिकाणी विधुत प्रवाह वीज तारांना जोडून विधुत भारीत तार शेतात सोडल्याने भला मोठा जंगली गवारेडा वीजेच्या धक्याने गतप्राण झाला .
या जंगली गवारेडा हत्या प्रकरणी वन विभागाने येथील इसम सुनिल भिकाजी गवस याला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे.या बाबत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे असे समजते या संशयीत आरोपी कडून आणखी काही माहिती मिळते का? याचा तपास वन विभागाने परिक्षेञ अधिकारी क्षीरसागर यांनी दिली.
