Headlines

रक्षाबंधन सणानिमित्त कुडाळ बाजरात राख्या खरेदीसाठी महिलांची गर्दी..

⚡कुडाळ ता.१०-:संदीप चव्हाण-: बहिण -भावाचे नाते मायेच्या प्रेमाच्या धाग्याने घट्ट बांधून ठेवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. भारतीय संस्कृतीमध्ये भय्यादूज किंवा रक्षाबंधन या नावाने तो साजरा करण्यात येतो. केवळ एका दिवसांवर आलेल्या रक्षाबंधनाच्या सनानिमित्त आज कुडाळ आठवडा बाजारमध्ये राखी खरेदीसाठी भगिनींची गर्दी पाहावयास मिळत आहे.

गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या टाळेबंदीमुळे राखी व्यवसायावर त्याचा परिणाम दिसून आला होता. मात्र यावर्षी कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने बाजारपेठा पूर्ण क्षमतेने व कोणतेही अटी शर्ती नसल्याने बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहावयास मिळते.
श्रावण पोर्णिमा राखी पौर्णिमा गुरुवार ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असून या दिवशी आपल्या भावाच्या हातात राखी बांधून बहीण भाऊ रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.
केवळ हिंदू धर्मामध्ये नव्हे तर इतर धर्मियांमध्ये हा सन सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रक्षाबंधन निमित्त सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू असला तरी परगावी राहणाऱ्या भावाला बहिणीकडून आठदिवस अगोदरच पोस्टाने किंवा कुरिअरने आवर्जून राखी पाठवली जाते. त्यामुळे आज कुडाळ आठवडा बाजारा दिवशी शहरात राखी खरेदीला वेग आल्याचे चित्र बाजारपेठेमध्ये पाहावयास मिळत आहे.

You cannot copy content of this page