दोडामार्ग ता.१५-:
दोडामार्ग तालुक्यातही वेदांता फॉक्सकॉन कंपनीचा १:४५ लाख कोटींचा महाराष्ट्रातील साधारण एक लाखापेक्षा अधिक युवकांना रोजगार मिळवून देणारा प्रकल्प गुजरातला गेल्याबद्दल युवासेनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी हे सरकार “खोके” सरकार असल्याचा आरोप युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे यांनी केला. सदरची स्वाक्षरी मोहीम युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच युवासेना विस्तारक अमित पेडणेकर, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाठ, उपजिल्हाप्रमुख सागर नाणोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ही मोहीम दोडामार्ग शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातुन सुरू करण्यात आली.
यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख मदन राणे, युवा सेना तालुका संघटक संदेश राणे, उपतालुकाप्रमुख संदेश गवस, शहर प्रमुख ओंकार कुलकर्णी, उप तालुकाप्रमुख प्रमुख गोविंद राऊळ उपतालुकाप्रमुख सिद्धेश कासार कोनाळ विभाग प्रमुख अल्विन लोबो माटणे विभाग प्रमुख विवेक एकावडे मणेरी विभाग प्रमुख शुभम देसाई साटेली उपविभागप्रमुख विकी धरणे कोनाळ उपविभाग प्रमुख सचिन केसरकर माटणे उपविभाग प्रमुख समीर धाऊसकर, कल्पेश करमळकर शुभम धरणे राजू गावडे प्रदीप गावडे उपस्थित होते.
