मडकईवाडा वझरी येथील अपघातात महिला जागीच ठार

वडीलांच्या श्राद्धाला जाताना काळाचा घाला

बांदा/प्रतिनिधी
मडकईवाडा-वझरी (ता. पेडणे) येथे काल सायंकाळी उशिरा दुचाकी व ट्रक या दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात दुर्गाई सुरेश सावंत (वय ५२, रा. इन्सुली) येथील महिला जागीच ठार झाली. वडिलांचे आज श्राद्ध असल्याने भावासोबत ती दुचाकीवरून (मागे बसून) माहेरी जात होती. घर केवळ ३०० मीटर अंतरावर असतानाच हा अपघात घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज गुरुवारी वडिलांचे श्राद्ध असल्याने दुर्गाई या आपला भाऊ सिद्धेश सूर्या सावळ यांच्यासोबत इन्सुली येथून गोव्यात जातं होत्या. स्कूटरच्या ( जीए ०३ जे ४६६८ ) मागे त्या बसल्या होत्या. मडकईवाडा- वझरी वळणावर धारगळला ते आले असता ट्रकच्या (जीए ०३ के ९ ३३० ) मागच्या टायरला स्कूटरची धडक बसली. या अपघातात दुर्गाई सावंत यांच्या डोक्यावरुन ट्रकचे चाक गेल्याने ती जागीच ठार झाली. तर स्कूटरचालक सिद्धेश सुदैवाने बचावला. अपघातापासून त्यांचे घर हाकेच्या अंतरावर राहिले होते. मोपा (पेडणे) पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.

You cannot copy content of this page