न्याहरी-निवास व्यावसायिकांसाठी देवबागला २८ रोजी कार्यशाळा

⚡मालवण ता.१६-: केंद्रीय पर्यटन मंत्रालय आणि पर्यटन व्यावसायिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने न्याहरी – निवास व्यावसायिकांसाठी २८ सप्टेंबर रोजी देवबाग येथील समर्थ सिनेमागृह येथे अतिथी गृह व्यवस्थापन तसेच वर्तन कौशल्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेत केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक, भारत पर्यटनचे संचालक व्यंकटेशन दत्तात्रेयन, भारत पर्यटनच्या माजी संचालक नीला लाड, उपसंचालक जगदीप ठोंबरे, भावना शिंदे, खादी ग्रामोद्योगचे जिल्हा संचालक आनंद कर्णिक, जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी, महाराष्ट्र टुर ऑपरेटर असोसिएशनचे उदय कदम, पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष विष्णू मोंडकर, सचिव नकुल पार्सेकर, महासंघाचे मालवण तालुका अध्यक्ष अविनाश सामंत, सावंतवाडी अध्यक्ष जितेंद्र पंडित, वेंगुर्ले अध्यक्ष महेश सामंत, आयएचएम गोवा येथील तज्ज्ञ मार्गदर्शक अभिषेक भोसले, उमेश बोडके आदी मार्गदर्शन करणार आहेत. पर्यटन व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारत पर्यटन मंत्रालय, मुंबई कार्यालय यांनी केले आहे.

You cannot copy content of this page