प्रि.एम. आर. देसाई इंग्लिश मिडीयम स्कुल च्या विद्यार्थ्यांचे गणित संबोध परीक्षेत १००% यश

⚡वेंगुर्ले ता.१६-: शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचालित प्रिं. एम आर. देसाई इंग्लिश मिडीयम स्कुल, वेंगुर्लाच्या विद्यार्थ्यांनी गणित संबोध परीक्षेत प्रथम श्रेणी सह उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन केले आहे.
या परीक्षेत प्रशालेच्या इयत्ता ५वी, व ८ वी चे एकूण 9 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत शाळेने १००% यश संपादन केले आहे.

शाळेतील इयत्ता ५वी मधून सात विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यात विशेष प्राविण्यासह दोन व प्रथम श्रेणीत तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इयत्ता आठवी मधून दोन विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्‍यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत यश संपादन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका मिताली होडावडेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांना गणित शिक्षिका संजया परब, धनश्री तुळसकर, पांडुरंग मिसाळ यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ व पालक यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page