कोळपे बौद्धवाडीतील ३२ वर्षीय तरुणाचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

वैभववाडी प्रतिनिधी
   कोळपे बौध्दवाडी येथील श्रीधर धोंडू कांबळे या ३२ वर्षे वयाच्या तरुणाचे हृदयविकाराच्या तीव्र धक्याने आकस्मिक निधन झाले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
     श्रीधर कांबळे याला सकाळी छातीत दुखू लागल्यामुळे मिञाच्या मोटारसायकलवरुन उंबर्डे  प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आला. त्याठिकाणी प्राथमिक उपचार करुन अधिक उपचारासाठी त्याला वैभववाडी येथे खाजगी डाॕक्टरकडे उपचारासाठी आणण्यात आले. माञ उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॕक्टरांनी सांगितले. ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे शवविच्छेदन करण्यात आले असून शुक्रवारी कोळपे बौध्दवाडी येथील स्मशान भूमिवर त्याच्यावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
    श्रीधर हा गेली दोन तीन वर्षे कोळपे येथे गावी होता. त्याअगोदर तो मुंबई येथे खाजगी कंपनीत कामाला होता. त्याला गायन व क्रीकेटची आवड होती. त्याच्या पश्चात आई वडील, पत्नी, दोन लहान मुले, भाऊ असा परिवार आहे. त्याच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर कोळपे गावावर शोककळा पसरली आहे.

You cannot copy content of this page