शास्त्रीय पकवाद वादन स्पर्धेत आरे गावच्या यश मेस्त्री ने पटकावला प्रथम क्रमांक…

देवगड-प्रतिनिधी
नुकत्याच रायगड जिल्हयामध्ये झालेल्या शास्त्रीय पकवाद वादन स्पर्धेमध्ये तालुक्यातील आरे गावचे सुपुत्र यश प्रकाश मेस्त्री याने प्रथम क्रमांक प्राप्त करीत आरे गावचे नाव उज्वल केले आहे.


रायगड जिल्हयामध्ये शास्त्रीय पकवाद वादन स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग या जिल्हयातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. देवगड तालुक्यातील आरे गावचे सुपुत्र यश मेस्त्री याने उत्कृष्ट असे पकवादाचे सादरीकरण करुन प्रथम क्रमांक मिळविला आहे. यश मेस्त्री याला लहानपणा पासुन वादय वृंदाची आवड असल्यामुळे त्याने स्थानिक भजनांमध्ये पकवाद वादनाची सुरुवात केली. आरे गावचे कोकणकला भुषन सुप्रसिध्द भजनी बुवा कै.चंद्रकांत कदम यांनी हरिनाम भजनामधून आरे गावचे नाव साता समुद्रा पार उज्वल केले आहे. यामुळे पकवाद वादनामध्येही यश मेस्त्री याच्या कर्तुत्वामधून आरे गावचे नाव पकवाद वादनामध्येही प्रसिध्द होत आहे. आरे गावचे उपसरपंच महेश पाटोळे, ग्रामसेवक केतन जाधव यांनी मेस्त्री यांचे या यशाबददल कौतुक केले आहे.
फोटो- रायगड येथे पकवाद वादनामध्ये यश प्राप्त केल्याबददल मान्यवरांच्या हस्ते यश मेस्त्री याचा सत्कार करताना आयोजक

You cannot copy content of this page