Headlines

विरोधकांनी रिफायनरी प्रकल्पासाठी समर्थन द्यावे

हा प्रकल्प होण्यासाठी आम्ही चर्चेला तयार;विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.१८-: वेदाता प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने विरोध करणाऱ्या विरोधकांनी रत्नागिरी येथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करावे, त्यासाठी एकत्र बसून आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथील विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी केले आहे. या प्रकल्पातून २…

Read More

सही पोषण देश रोशन उपक्रमाचा शुभारंभ

बांदा निमजगा अंगणवाडी केंद्रातील उपक्रम बांदा/प्रतिनिधीबांदा निमजगा येथील अंगणवाडीत ‘सही पोषण देश रोशन’ या उपक्रमातर्गत मुलांसाठी पौष्टिक आहाराचे महत्व पटवून देण्यासाठी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मुलांना अंगणवाडी सेविका पालकांनी स्वतः शिजविलेले पौष्टिक अन्नपदार्थ देण्यात आले.यावेळी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश पटवर्धन, डॉ. आरती चिटणीस, ग्रामपंचायत सदस्या सौ. स्वप्नाली पवार, आरोग्य सेवक श्री….

Read More

आजगाव, मळेवाड, धाकोऱ्यात पर्यावरणास हानिकारक प्रकल्प नको

जिल्हा परिषद माजी सदस्य राजन मुळीक : ग्रामस्थांचा तीव्र विरोध, ग्रा.पं.ने परवानगी देऊ नये ⚡बांदा ता.१८-: सावंतवाडी तालुक्यातील आजगाव, मळेवाड, धाकोरा ग्रामपंचायत हद्दीत पर्यावरणाला हानी पोहोचविणारा एक खनिज प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे परिसरातील भातशेती तसेच घरांचीही हानी होणार असल्याने याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे आजगाव, मळेवाड, धाकोरा ग्रामपंचायतने अशा पर्यावरणास हानीकारक…

Read More

सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिरात १७ जणांचे रक्तदान

⚡सावंतवाडी ता १८-: रक्तदान अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून भारताच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शाखा- सावंतवाडी यांच्या मार्फत शनिवार दि.१७ सप्टेंबर रोजी सावंतवाडी रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी १७ जणांनी रक्तदान करून जादूई आकडा गाठला. रक्तदान अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य रक्तसंक्रमण परिषदेने रक्तदान शिबिरासाठी १७ सप्टेंबर ही…

Read More

पुंडलिक दळवी यांच्यावरील हल्ला निंदनीय

राष्ट्रवादी महिला आघाडी अध्यक्षा अर्चना घारे – परब ⚡सावंतवाडी ता.१८-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष,श्री. पुंडलिक दळवी यांच्यावर झालेला भ्याड हल्ला हा निंदनीय आणि निषेधार्ह आहे. सावंतवाडीच्या संस्कृतीला काळीमा फासणारी आहे. अशा घटना पुन्हा घडू नये याची पोलिसांनी खबरदारी घेतली पाहिजे आणि त्यासाठीच संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहीजे आशी मागणी कोकण विभाग महिला आघाडीचे अध्यक्ष…

Read More

कणकवली शहरात आणखी एक नवीन रस्ता साकारणार

प्रांत कार्यालयाच्या बाजूने कॉलेज रोडला जोडणार; वाहतूक समस्या मिटणार ⚡कणकवली ता.१८-: विकासाचा मार्ग हा रस्ते ठरवित असतात याची प्रचिती कणकवली शहरात येऊ लागली असून आता कणकवली शहरात अजून एक नवीन रस्ता अस्तित्वात आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. कणकवली शहरातील प्रांत कार्यालयाकडून ॲड. उमेश सावंत यांच्या घरालगत ते प्रांत कार्यालयाच्या मागील बाजूस कॉलेज रोडला जोडणारा…

Read More

लेखन कौशल्यासाठी निबंध लेखन कार्यशाळा उपयुक्त

संजीवनी फडके;कणकवली नगरवाचनालयातर्फे निबंध लेखन कार्यशाळेचे आयोजन ⚡कणकवली ता.१८-: लेखन कौशल्याचा अभ्यास करण्यासाठी निबंध लेखन कार्यशाळा उपयुक्त ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना अशा कार्यशाळांमध्ये सहभागी होऊन लेखन कौशल्य आत्मसात केले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन कार्यशाळा घेण्याचानगरवाचनालयाचा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन शिक्षिका संजीवनी फडके यांनी केले. कणकवली येथील नगरवाचनालय हॉलमध्ये नगरवाचनालयाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी मराठी निबंध लेखन कार्यशाळा…

Read More

परप्रांतीय कामगारांना विरोध करीत असल्याने मनसे कार्यकर्त्यांना मारहाण प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न

राजू कासकर यांचा आरोप:शहरातील मनसेची ताकद दाखवून देऊ; राष्ट्रवादीला दिला इशारा.. ⚡सावंतवाडी ता.१८-: मनसे पदाधिकाऱ्यांना नाहक गोवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र हे खपवून घेतलं जाणार नाही परप्रांतीय कामगारांना मनसे करत असलेल्या विरोध यामुळे राष्ट्रवादीला हे पटत नसल्याने आमच्या पदाधिकाऱ्यांना गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मनसे पर्यावरण जिल्हा अध्यक्ष राजू कासकर यांनी केला आहे. काल राष्ट्रवादी…

Read More

कुंभवडेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र या

खा.अरविंद सावंत;शिवसेना नेते अरविंद सावंत यांचा कुंभवडे ग्रामस्थांकडून नागरी सत्कार ⚡कणकवली ता.१८-: आपल्या गावातून आपल्या माणसांकडून होणारे कौतुक, सत्कार हे आपलेपणाची जाण निर्माण करतात.जीवनात प्रेरणा देतात म्हणून आपल्या माणसांची कौतुकाची थाप नेहमीच मलाच नाही तर कर्तृत्व गाजवणाऱ्या प्रत्येकाला हवीहवीशी वाटत असेल.असेच एकत्र या, एकमेकांना सहकार्य करा, विशेष करून कुंभवडे गावाच्या विकासासाठी सर्वांनी मिळून एकत्र येऊन…

Read More

इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत कणकवलीत जनजागृती रॅली

⚡कणकवली ता.१८-: -इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत कणकवली शहरात नगरपंचायतने या स्वच्छता उपक्रमांमध्ये सहभागी होत कणकवली शहरातून पटकीदेवी ते पटवर्धन चौकापर्यंत कणकवली कॉलेज, विद्यामंदिर हायस्कूल व एनसीसीच्या विद्यार्थ्यांसह जनजागृती रॅली काढली. यावेळी स्वच्छतेच्या जनजागृतीच्या घोषणाही देण्यात आल्या. इंडियन स्वच्छता लीग मध्ये कणकवली नगरपंचायतने सहभाग घेतला असून, या अंतर्गत ही रॅली काढण्यात आली. या मोहिमेअंतर्गत आम्ही कणकवलीकर…

Read More
You cannot copy content of this page