⚡कणकवली ता.१८-: -इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत कणकवली शहरात नगरपंचायतने या स्वच्छता उपक्रमांमध्ये सहभागी होत कणकवली शहरातून पटकीदेवी ते पटवर्धन चौकापर्यंत कणकवली कॉलेज, विद्यामंदिर हायस्कूल व एनसीसीच्या विद्यार्थ्यांसह जनजागृती रॅली काढली. यावेळी स्वच्छतेच्या जनजागृतीच्या घोषणाही देण्यात आल्या.
इंडियन स्वच्छता लीग मध्ये कणकवली नगरपंचायतने सहभाग घेतला असून, या अंतर्गत ही रॅली काढण्यात आली. या मोहिमेअंतर्गत आम्ही कणकवलीकर अंतर्गत टीममध्ये सहभागी होण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. नगराध्यक्ष समीर नलावडे, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबवण्यात आले. यावेळी “आम्ही कणकवलीकर असल्याचा आम्हाला अभिमान आहे” “स्वच्छता पाळू या, नगरपंचायतला सहकार्य करूया” असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. यावेळी नगरपंचायतचे गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक मेघा गांगण, नगरपंचायतचे किशोर धुमाळे, लेखापाल प्रियांका सोनसुरकर, स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, रुजुता ताम्हणेकर, ध्वजा उचले, मनोज धुमाळे, अमोल भोगले, सतीश कांबळे, प्रदीप गायकवाड, सचिन नेरकर, विजय राणे, संदीप मुसळे, सुमित कुबल आदी उपस्थित होते. यावेळी स्वच्छ कणकवली, सुंदर कणकवली माझी कणकवली, सुंदर कणकवली अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच कणकवली शहरातील जनतेने स्वच्छता मोहिमेत सहभाग घ्या व सहकार्य करा असे आवाहन नगरपंचायतच्या वतीने करण्यात आले.
