सही पोषण देश रोशन उपक्रमाचा शुभारंभ

बांदा निमजगा अंगणवाडी केंद्रातील उपक्रम

बांदा/प्रतिनिधी
बांदा निमजगा येथील अंगणवाडीत ‘सही पोषण देश रोशन’ या उपक्रमातर्गत मुलांसाठी पौष्टिक आहाराचे महत्व पटवून देण्यासाठी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मुलांना अंगणवाडी सेविका पालकांनी स्वतः शिजविलेले पौष्टिक अन्नपदार्थ देण्यात आले.
यावेळी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश पटवर्धन, डॉ. आरती चिटणीस, ग्रामपंचायत सदस्या सौ. स्वप्नाली पवार, आरोग्य सेवक श्री. म्हापणकर, रत्नाकर आगलावे, निलेश देसाई, अंगणवाडी सेविका सौ. वर्षा आगलावे, मदतनीस सौ. गीतांजली सावंत, आशा सेविका सौ. संजना सावंत, गटप्रवर्तक सौ. मृदाली सावंत, सौ. सरिता भोगले, पालक सौ. लक्ष्मी गवस, सौ. अनिशा पंडित, सौ. हेमलता शिंदे, सौ. सुनीता पाटील, सौ. गौरी कल्याणकर, सौ. वीणा कानसे, सौ. वैशाली सुतार, सौ. वेदांगी सावंत, सुमन सावंत, पूर्वा कुडव आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. पटवर्धन व डॉ. चिटणीस यांनी पोषण आहाराचे महत्व, बाळाच्या वाढीचे १ हजार दिवस, ऍनिमिया, अतिसार, हात धुणे, शरीराची स्वच्छता याबाबत पालकांना मार्गदर्शन केले. सौ. वर्षा आगलावे यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page