⚡सावंतवाडी ता १८-: रक्तदान अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून भारताच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शाखा- सावंतवाडी यांच्या मार्फत शनिवार दि.१७ सप्टेंबर रोजी सावंतवाडी रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी १७ जणांनी रक्तदान करून जादूई आकडा गाठला.
रक्तदान अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य रक्तसंक्रमण परिषदेने रक्तदान शिबिरासाठी १७ सप्टेंबर ही तारीख विशेष तारीख म्हणून जाहीर केली होती. रक्तदान शिबिरासाठी केवळ दोन दिवसाचा अवधी मिळाला असतानाही सिंधुरक्तमित्रांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे रक्तदात्यांनी उत्साहपूर्ण वातावरणात रक्तदान केले, एवढेच नव्हे तर १७ तारीख ध्यानात ठेऊन एकूण रक्तदान केलल्या रक्तदात्यांचा १७ हा जादुई आकडा सुद्धा गाठला.
दरम्यान सर्व रक्तदात्यांना राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या ऑनलाईन प्रमाणपत्राने त्याचवेळी सन्मानित करण्यात आले. या रक्तदान शिबिरासाठी लायन्स क्लब सावंतवाडीचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी केदार नाईक (वेत्ये), प्रसाद सावंत व जयगणेश गावकर (दोघेही ओटवणे), सागर गडेकर (सातोसे), अनिकेत कुडतरकर व आशिष कुडतरकर (दोघेही कोलगाव), निलेश मुळीक (धाकोरे), गुरुनाथ कुंभार (सांगेली), कैलास परब (कुणकेरी), विष्णू धुरी (म्हापसा) तसेच विनित तावडे, बिद्युतकुमार हलधर, अॅड. अभिजित पणदूरकर, संदीप तळेकर, दिपक मुंज, किशोर चिटणीस, रक्त दाता संघटनेचे सचिव बाबली गवंडे (सर्व राहणार सावंतवाडी) इत्यादी सतरा जणांनी बहुमोल असे रक्तदान करुन खर्या अर्थाने रक्तदान अमृतमहोत्सव साजरा केला.
रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, जिल्हासचिव किशोर नाचणोलकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष सुनिल राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी तालुका खजिनदार सिद्धार्थ पराडकर, तालुका सहसचिव अनिकेत सावंत, तालुका सदस्य जयगणेश गावकर, तालुका सचिव बाबली गवंडे इत्यादींनी विशेष मेहनत घेतली. तसेच सावंतवाडी रक्तपेढीचे प्रशांत सातार्डेकर, अनिल खाडे, मानसी बागेवाडी, प्राजक्ता रेडकर यांनीसुद्धा रक्तसंकलनाचे कार्य उत्तमरित्या पार पाडले.
यावेळी उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडीचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. संदीप सावंत, स्रीरोगतज्ञ डाॅ. ज्ञानेश्वर दूर्भाटकर , सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी – दोडामार्ग विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर, लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष विद्याधर तावडे, अँड. परीमल नाईक, अमेय पई, मोहिनी मडगावकर तसेच इतर वरिष्ठ पदाधिकार्यांसहीत लायन्स सदस्य उपस्थित होते.
