पुंडलिक दळवी यांच्यावरील हल्ला निंदनीय

राष्ट्रवादी महिला आघाडी अध्यक्षा अर्चना घारे – परब

⚡सावंतवाडी ता.१८-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष,श्री. पुंडलिक दळवी यांच्यावर झालेला भ्याड हल्ला हा निंदनीय आणि निषेधार्ह आहे. सावंतवाडीच्या संस्कृतीला काळीमा फासणारी आहे. अशा घटना पुन्हा घडू नये याची पोलिसांनी खबरदारी घेतली पाहिजे आणि त्यासाठीच संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहीजे आशी मागणी कोकण विभाग महिला आघाडीचे अध्यक्ष सौ अर्चना घारे परब यांनी केली आहे तसेच

. अशा प्रवृत्तीनी डोके वर काढण्याआधीच प्रवृत्तींना ठेचले पाहीजे. संबंधित प्रकारा बाबत घारे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते श्री.अजीतदादा पवार यांचा देखील लक्ष वेधले असून पवार यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

You cannot copy content of this page