राजू कासकर यांचा आरोप:शहरातील मनसेची ताकद दाखवून देऊ; राष्ट्रवादीला दिला इशारा..
⚡सावंतवाडी ता.१८-: मनसे पदाधिकाऱ्यांना नाहक गोवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र हे खपवून घेतलं जाणार नाही परप्रांतीय कामगारांना मनसे करत असलेल्या विरोध यामुळे राष्ट्रवादीला हे पटत नसल्याने आमच्या पदाधिकाऱ्यांना गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मनसे पर्यावरण जिल्हा अध्यक्ष राजू कासकर यांनी केला आहे.
काल राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्यावर मनसेने च्या काही पदाधिकाऱ्यांनी व्हाट्सअप ग्रुप वरून रिमूव केल्याच्या रागातून हल्ला केला होता. त्यानंतर मनसैनिक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यामुळे कुठेतरी मनसैनिक पदाधिकाऱ्यांना अडकवण्यासाठी हा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचा राजू कासकर यांनी आरोप केला आहे. असा प्रकार होत असेल तर शहरातील मनसेची ताकद दाखवून देऊ असा इशारा देखील त्यांनी राष्ट्रवादीला यावेळी दिला आहे.
