Headlines

महाकाल मंदिर परिसरातील सुशोभीकरण कामाचे लोकार्पण

भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्याहस्ते विधिवत पूजा;माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्याहस्ते झाली महाआरती सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उज्जैन येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या महाकाल मंदिराच्या परिसरात सुशोभीकरण आणि सुविधा निर्माण केलेल्या विविध कामांचे लोकार्पण होते आहे. यानिमित्त आज संध्याकाळी सावंतवाडीत श्री नारायण मंदिरामध्ये भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या हस्ते शिवलिंगावर…

Read More

युवकाचे युट्यूब हॅक करून युवकाची ऑनलाईन फसवणूक

बांदा/प्रतिनिधीनेतर्डे येथील युवकाची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे . सदर युवकाचे युट्यूब चॅनेल हॅक करण्यात आले आहे . तशा आशयाची तक्रार साहील संतोष कुबल ( २१ , नेतर्डे ) याने बांदा पोलीसात दिली आहे . पुढील तपास कुडाळ पोलीस निरीक्षक श्री . हुलावळे करीत आहेत .याबाबत बांदा पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की , नेतर्डे…

Read More

विजेचा लोळ अंगावर पडुन युवकाचा मृत्यू

सांगली गुरगुटवाडी येथील दुर्दैवी घटना सावंतवाडी ता.११-:अंगावर विजेचा लोळ कोसळल्यामुळे सांगेली गुरगुटवाडी येथील युवक जागीच ठार झाला असून, ही घटना आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हनुमंत झोरे ( वय २९) असे त्या युवकाचे नाव असून, सकाळी उठून तो बाहेर गेला असताना ही घटना घडली आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.

Read More

आयडियलच्या श्रावणधार जिल्हास्तरीय सुगम संगीत स्पर्धेत प्राजक्ता ,हर्षदा, विनय प्रथम

⚡कणकवली ता.११-: ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे आणि डॉ.राजअहमद हुसेनशा पटेल चॅरिटेबल ट्रस्ट हरकुळ बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय सुगम संगीत स्पर्धा आयडियल इंग्लिश स्कूल वरवडेमध्ये पार पडली.ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे यांच्या हस्ते उदघाटन समारंभ पार पडला ,या स्पर्धेत जिल्हाभरातुन 35 स्पर्धक…

Read More

रोटरी क्लब मालवणतर्फे मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

⚡मालवण ता.११-: रोटरी क्लब मालवण तर्फे शालेय मुली व स्त्रियांसाठी मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन कार्यक्रम घेण्यात आला. या अंतर्गत ७००० बायोडिग्रेडेबल सॅनिटरी पॅड्सचे वितरण करण्यात आले. यात मुलींना सहा महिने पुरतील एवढी पॅड्स क्लब मार्फत पुरविण्यात येणार आहेत. तसेच आरोग्यसेविका व अंगणवाडी सेविकांना मेन्स्ट्रुअल कपचे वाटप करण्यात आले. तर एका शाळेला नॉनइलेक्ट्रिक इंसिनेरटर प्रदान करण्यात…

Read More

ग्रामपंचायत निगुडे तर्फे महिला बचत गटांना बँक ऑफ इंडिया च्या वतीने शिबिर

⚡बांदा ता.११-: ग्रामपंचायत, निगुडे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री देवी माऊली मंदिर निगुडे या ठिकाणी बँक ऑफ इंडिया शाखा- बांदा यांच्यावतीने शिबिर आयोजित केले होते सदर कार्यक्रम श्री देवी माऊली मंदिर निगुडे या ठिकाणी पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निगुडे उपसरपंच श्री गुरुदास गवंडे यांनी केले यावेळी व्यासपीठावर बांदा शाखेचे बँक लोन अधिकारी श्री सागर व बांदा…

Read More

सातार्डेत पावणे पाच लाखांची दारु जप्त

एक्साइजच्या कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई ⚡बांदा ता.११-: गोव्यातून सिंधुदुर्गात होणार्‍या बेकायदा गोवा बनावटीच्या दारु वाहतूकी विरोधात एक्साइजच्या कोल्हापूर भरारी पथकाने आज सकाळी सातार्डेत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत विविध ब्रँडचे ७० दारुचे बॉक्स जप्त करण्यात आले. कारवाईत ४ लाख ६४ हजार ४०० रुपयांच्या दारुसह ५ लाख २० हजार रुपयांची स्विफ्ट कार असा एकूण ९…

Read More

१०० रुपयांत दिवाळी गिफ्ट या आठवड्यात होणार वितरीत

जिल्हा पुरवठा अधिकारीआणि यांची माहिती;राज्य शासनाने जाहीर केलीय योजना सिंधुदुर्गनगरी ता ११राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या १०० रुपयात शिधा जिन्नस संच दिवाळी गिफ्ट अंतर्गत अंत्योदय, प्राधान्य कुटुंबातील रेशन कार्डधारकांना हा संच मिळणार आहे. संबंधित कंत्रात दाराकडे याबाबतची मागणी पुरवठा विभागाने नोंदवली आहे. हे संच या आठवड्यात उपलब्ध झाल्यानंतर त्याचे वाटप सुरू होणार आहे. अशी माहिती…

Read More

सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या ३६ कार्यकर्त्यांचा माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांच्याहस्ते सत्कार

बांदा/प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना कालावधीत तसेच आतापर्यंत रक्तदान चळवळीत अमूल्य योगदान देणाऱ्या सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या ३६ कार्यकर्त्यांचा सन्मान वेंगुर्ले येथे माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आला.अटल प्रतिष्ठान, किरात ट्रस्ट व माझा वेंगुर्ला या संस्थांच्या वतीने वेंगुर्ले येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कोविड काळात वैद्यकीय सेवा बाजाविलेल्या…

Read More

पाडलोस केणीवाडा येथील सुमित्रा नाईक यांचे निधन

⚡बांदा ता.११-: पाडलोस केणीवाडा येथील सौ.सुमित्रा परशुराम नाईक (वय 65) यांचे राहत्या घरी मंगळवारी (आज) संध्याकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या पच्छात पती, मुलगा, विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे, दीर, पुतणे असा मोठा परिवार आहे. बुधवारी सकाळी स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते बंड्या नाईक यांच्या त्या आई तर पत्रकार विश्वनाथ नाईक यांच्या…

Read More
You cannot copy content of this page